Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: वडिलांची एन्ट्री अन् अंकिता ढसा ढसा रडली, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं? Video पाहा

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये अंकिताला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात तिचे वडील आणि बहिणीं आल्या आहेत. वडिलांना बघितल्यानंतर अंकिता भावूक झाली आहे

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा शेवटचा टप्पा सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकताच बिग बॉसच्या घरात फ्रीझ अॅन्ड रिलीजचा टास्क सुरू आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या घरातल्यांना पाठवण्यात येते असा हा टास्क आहे. नुकताचं अभिजीत सांवतची पत्नी व मुलीसोबत हा टास्क खेळण्यात आला. अशातच आता अंकिताची वेळ आली आहे.

कलर्स मराठीवर नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये अंकिताचे वडिल आणि बहीण अंकिताला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात आले आहेत. वडिलांना बघितल्यानंतर अंकिता भावूक झाली आहे. वडिलांना पाहून अंकिताने घट्ट मिठी मारलेली दिसलेली आहे. एका मुलीसाठी वडिल हे नेमकं काय असतात हे या व्हिडीओतून स्पष्ट होते.

प्रोमोमध्ये, "अंकिता जोरात बाबा ओरडते तेवढ्यातच बिग बॉसच्या घरात अंकिताच्या बाबांची एन्ट्री होताना दिसते. पुढे अंकिता म्हणते, थॅक्यू बिग बॉस माझ्या बाबांना पहिल्यादा मुंबईत आणल्याबद्दल ... बाबा थांब ना रे तू .."

बिग बॉस मराठी पाचव्या सीझनला २८ जुलैपासून सुरूवात झाली. आतापर्यत बिग बॉस मराठीचे आठ आठवडे झाले आहेत. नवव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात फ्रीझ अॅन्ड रिलीज टास्क सुरू आहे. यामध्ये बिग बॉसमधील स्पर्धकांना परिवारासोबत भेटण्याचा हा टास्क आहे. काही दिवसांतच बिग बॉस मराठीचा शो संपणार आहे. येत्या ६ ऑक्टोबर बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 518 घरांची पडझड

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

SCROLL FOR NEXT