Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: ग्रँड फिनालेपूर्वी 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात अभिजीतला मिळाली ट्रॉफी; निक्की म्हणाली, 'खुश राहा...'

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात अभिजीत सांवत कौतुक होताना दिसत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीची सध्या तुफान चर्चा आहे. बिग बॉस या सीझनमध्ये अनेक सेलिब्रिटींची धमाल पाहायला मिळाली आहे. नुकतीच बिग बॉसच्या घरात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी या कलाकारांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात अभिजीत सांवत कौतुक होताना दिसत आहे.

बिग बॉस मराठीच्या या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात हसताय ना हसायला पाहिजेची टीम दिसत आहे. दरम्यान यावेळी डॉ निलेश सांबळे स्पर्धकांची शाळा घेताना दिसत आहे. निलेश सांबळे अभिजीत सांवतचा ट्रॉफी देऊन सत्कार करताना दिसत आहे. एक हुरहन्नरी आवडलेलं व्यक्तीमत्व अश्या शब्दात निलेश साबळेने कौतुक देखील केलं आहे. बिग बॉसच्या घरातील निलेश साबळेच्या खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

कलर्स मराठीवरील या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार हे आठही सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांमध्ये कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT