Bigg Boss Marathi 5 Grand Finale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Winner Trophy: बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर, पाहा Video

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला आता फक्त २ दिवस उरलेले आहेत. त्यातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर आला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ चा प्रवास आता अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. बिग बॉसचा पाचवा सीझन पहिल्यादिवसापासून चर्चेत आहे. हे पर्व सुरु झाल्यामुळे त्यातील ट्वीस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि खेळ यावरुन यंदा ‘बिग बॉस’चे पर्व चांगलेच गाजले. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला आता फक्त २ दिवस उरलेले आहेत. त्यातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर आला आहे.

बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाची सुरुवात २८ जुलैला झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होते. नुकतंच बिग बॉसच्या घरात मीड विक एव्हिकेशन पार पडले. यात अभिनेत्री वर्षा उसगावकर बाहेर पडल्या. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ६ सदस्य मिळाले.त्यातच आता ‘कलर्स मराठी’ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर बिग बॉसने यंदाच्या बिग बॉसची ट्रॉफीची झलक दाखवली आहे.

इतकंच नव्हे तर ‘कलर्स मराठी’ने या ट्रॉफीचा एक खास व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओ बिग बॉसच्या ट्रॉफीचा खास लूक पाहायला मिळत आहे. यावर बिग बॉसचा लोगोही पाहायला मिळत आहे. त्याखाली बिग बॉस आणि विजेता असेही लिहिण्यात आले आहे. या दोन्हीही व्हिडीओंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.दरम्यान बिग बॉसच्या घराला टॉप ६ सदस्य मिळाले आहेत. यात निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे टॉप ६ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले आहेत. दरम्यान यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

SCROLL FOR NEXT