Zapuk Zupuk SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zapuk Zupuk : 'एका बुक्कीत टेंगूळ...', गुलीगत सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाची पहिली झलक पाहिलीत का?

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली आहे. सूरज चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याचा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात झाली आहे.

सूरजने मोरगावच्या गणपती बाप्पाचा आणि जेजुरीच्या खंडोबा देवाचा आशीर्वाद घेत 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या प्रमोशन ची सुरुवात केली आहे. तसेच नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. यात चित्रपटाची एक छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओतून प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घातली आहे. हा व्हिडीओ शेअर करून लवकरच चित्रपटाचा टिझर पाहायला मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटात सूरजसोबतच जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार झळकणार आहेत. 'झापुक झुपूक' च्या माध्यमातून सूरज एका नवीन प्रवासाला सुरूवात करणार आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट कौटुंबिक आणि मनोरंजनने भरपूर अशी एक धमाल लव्हस्टोरी आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिल ला रिलीज होणार आहे.

'झापुक झुपूक' चित्रपटाच्या या खास व्हिडीओला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. त्यांनी लिहिलं की, "अख्या महाराष्ट्राने माझ्यावर प्रेम केलं, आता धमाका करायची वेळ आलीये…! कस झापुक झुपूक " या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सर्वजण सूरजचे कौतुक करत आहेत आणि त्याला शुभेच्छा देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT