Suraj Chavan Emotional Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Emotional: "आज आई पप्पा असते तर..." बिग बॉस विजयाचा 'तो' क्षण अन् सुरजचे डोळे पाणावले; Video पाहा

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण ठरला आहे. बिग बॉसचं यंदाच्या सीझनमध्ये सुरजच्या हटके स्टाईलने कमालीचं मनोरंजन केलं

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण ठरला आहे. बिग बॉसचं यंदाच्या सीझनमध्ये सुरजच्या हटके स्टाईलने कमालीचं मनोरंजन केलं. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सुरजला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला. मात्र छोट्याशा गावातून पुढे स्वमेहनतीने पुढे आलेला सुरज अनेकदा बिग बॉसच्या घरात भावूक होताना दिसलाय.

सुरज हा सोशल मीडियावर स्टार आहे. आवड म्हणून सुरज विनोदी व्हिडीओ बनवायचा. याच त्यांच्या मनोरंजनात्मक केलेने त्याने बिग बॉसचं घर चांगलंच गाजवलं. बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता घोषणा होत असताना सुरज भावूक झाला. कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख यांनी ग्रँड फिनालेदरम्यान बिग बॉसच्या विजेताची घोषणा करताच सुरजने रितेश देशमुखला घट्ट मिठी मारली. याचदरम्यानचा सुरजचा भावून झालेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या घरात सुरज कुटुंबियांच्या आठवणीत भावुक होत दिसला. अनेकदा त्याने, “मी घरच्या माणसांना खूप मिस करत आहे. माझ्या आई मरी मातेला मिस करतोय. आई-आप्पांची आठवण येत आहे. ती खूप चांगली माणसं होती. दिलदार माणसं होती. लहान असताना मला माझ्या जवळची बरीच लोक सोडून गेली. त्यांनी असं करायला नको होतं. ती आज असती तर खूप बरं झालं असतं. ते आज असते तर लेकाला मोठं होताना त्यांनी पाहिलं असतं. त्यांना खूप आनंद झाला असता”.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT