Nikki Tamboli SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli : निक्कीला फुल्ल सपोर्ट करा, बिग बॉसची ट्रॉफी आपलीच; नंदुरबारकरांनी काढली मिरवणूक

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी 5'च्या ग्रँड फिनालेला आता काही तास उरले आहेत. अशात निक्कीला पाठिंबा देण्यासाठी गावकरी पुढे सरसावले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा (Bigg Boss Marathi) आज (6 ऑक्टोबर) ग्रँड फिनाले आहे. सर्वत्र कोण उचलणार यंदा 'बिग बॉस मराठी' सीझन 5 ची ट्रॉफी याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रत्येकजण आपला आवडता स्पर्धक जिंकावा यासाठी होट करत आहे.

निक्की तांबोळी (Nikki Tamboli ) हिने 'बिग बॉस मराठी 5'चा सीझन गाजवला आहे. ती घरात अनेक वेळा भांडणे आणि राडा करताना पाहायला मिळाली आहे. तसेच अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीचे वारे देखील बिग बॉसच्या घरात वाहताना पाहायला मिळाले होते. अरबाज बिग बॉसच्या घरातून गेल्यावर निक्कीला खूप त्रास झाला. ती खूप रडताना पाहायला मिळाली. 300 कॉईन्स असल्यामुळे निक्कीला पहिलेच 'तिकीट टू फिनाले' मिळाले.

निक्की तांबोळी ही नंदुरबार तालुक्यातील आहे. नंदुरबारच्या लोकांचा तिला फूल सपोर्ट आहे. ती नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावाची रहिवाशी आहे. तिनेचं 'बिग बॉस मराठी 5'ची ट्रॉफी जिंकावी असे गावकऱ्यांना वाटत आहे. यासाठी गावकरी पुढे सरसावले आहेत. गावकरी ढोल ताशाच्या गजरात गावात मिरवणूक काढून निक्की तांबोळीला मते देण्याचे आवाहन करत आहेत. यात काका रतिलाल तांबोळी, चुनीलाल तांबोळी, दिलीप तांबोळी यांच्यासह नातेवाईक आणि गावकऱ्यांचा समावेश आहे.

बिग बॉस मराठीच्या संपूर्ण सीझनमध्ये निक्की तांबोळीच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. तिच्या वडिलांनी नंदुरबार येथे शिक्षण घेतल्यानंतर ते नोकरीसाठी बाहेरगावी गेले आणि तिथेच स्थायिक झाले. गावात अनेक कार्यक्रमांच्या वेळी निक्की गावात येत असते. त्यांचे गावाला मोठे घर आहे. नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी निक्की भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी रॅली काढण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन

Sugar Price: गणेशभक्तांना मोठा दिलासा! साखरेच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT