Bigg Boss Marathi 5 Home Tour Pics Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : स्टायलिश फर्निचर, आरामदायी बेड्स अन् बरंच काही... अखेर ‘बिग बॉस’च्या घराची पहिली झलक आली; पाहा Photos

Bigg Boss Marathi 5 Home Tour : बिग बॉसच्या घरातील इन्साईड फोटोज् आणि व्हिडिओज् समोर आले आहेत. या घरातले फोटोज् सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

गेल्या अनेक दिवसांपासून चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, अखेर तो क्षण आज आला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’चा आज ग्रँड प्रिमियर होणार आहे. आजच्या ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना नव नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. शिवाय, यंदाच्या ‘बिग बॉस’ घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे. पण अशातच बिग बॉसच्या घरातील इन्साईड फोटोज् आणि व्हिडिओज् समोर आले आहेत. या घरातले फोटोज् कलर्स मराठीच्या सोशल मिडिया हँडलवर शेअर करण्यात आलेले आहेत.

"बिग बॉस मराठीच्या Grand घराची Grand झलक, खास तुमच्यासाठी..."असं कॅप्शन देत घरातले फोटोज् शेअर केले आहेत. ‘Bigg Boss Marathi’च्या घरात प्रवेश करताच भव्य प्रवेशद्वार आहे. त्यानंतर आपण लिव्हिंग एरियामध्ये जातो. लिव्हिंग एरियामध्ये, स्टायलिश फर्निचर, आरामदायी बेड्स वैगेरे अशा हटके फर्निचरची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यासोबतच किचनही खूपच सुंदर दिसत आहे. स्टायलिश डिझाईन करून हे किचन तयार करण्यात आलेले आहे.

कॅप्टन रुम आणि बेडरुमला निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या थीमने सजवण्यात आले आहे. कॅप्टन रुमला अतिशय ड्रिमी लूक देण्यात आला आहे. या लूकने सर्वांचेच लक्ष हटक्या पद्धतीने वेधले आहे. यंदाची थीम जंगलची दिसत आहे. ही थीमही अतिशय ड्रिमी असून नजर हटतच नाहीये. घरामध्ये मानवी चेहर्‍यांचेही विविध रुप पाहायला मिळत आहे. घरामध्ये गेल्यावर तुम्हालाही जाणवेल की, आपण अंडर वॉटर आहोत. घरातला एकूण एक कोपरा खूपच सुंदर असून घराची जोरदार चर्चा होत आहे.

स्टायलिश अंदाजात जरीही हे घर असलं तरीही यंदा निर्मात्यांनी घराला मराठमोळा टच दिलेला नाही. मराठी बिग बॉसचं प्रतीक म्हणून लावण्यात येणारी मराठमोळी नथ किंवा चंद्रकोर यंदाच्या बिग बॉस मराठीच्या घरात मिसिंग असल्याचं मात्र दिसून असल्यामुळे प्रेक्षक ही गोष्ट मिस करणार आहेत. आज २८ जुलैला रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर पार पडतोय. अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. यावेळी बिग बॉस मराठीच्या घरात कोण कलाकार जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT