Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर रितश भाऊंचा कल्ला...२ आठवड्यानंतर भाऊच्या धक्क्यावर पुन्हा एन्ट्री

Ritesh Deshmukh Entry on Bhaucha Dhakka: बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता लवकरच घोषित होणार आहे. तब्बल २ आठवड्यानंतर रितेश भाऊंची भाऊच्या धक्क्यावर दमदार एन्ट्री पाहायला मिळाली आहे.

Saam Tv

बिग बॉस मराठीचा ५वा सीझन अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. बिग बॉसच्या ५व्या सीझनला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळला आहे. अगदी कमी दिवसांमध्ये बिग बॉसच्या या सीझनने प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा केली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठीच्या महाअंतीम सोहळ्यापूर्वी रितेश भाऊंची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांकडून रितेश देशमुख यांच्या सुत्रसंचालनाला भरपूर पसंती मिळाली होती.

बिग बॉस मराठीचा ५वा सीझन २८ जुलै रोजी सुरु झाला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यंदाचा बिग बॉस मराठी १०० दिवसांचा नसून ७० दिवसातचा आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच दिवसांपासून घरातील सदस्यांमध्ये भरपूर राडे पाहायला मिळाले होते. घरातील सर्व सदस्यांनी बिग बॉसच्या ग्रॅंड फिनालेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

बिग बॉसच्या मंचावर रितेश भाऊंची तब्बल २ आठवड्यानंतर ग्रॅंड एन्ट्री झालेली पाहायला मिळाली आहे. 'बेबी ब्रिंग इट ऑन' या गाण्यावर रितेश देशमुळे यांनी डांन्स परफॉमेंस केला आहे. त्यानंतर रितेश भाऊंनी प्रेशकांची माफी मागुन "मी हाऊसफुल ५ या चित्रपटाच्या शुटींमसाठी युरोपला गेलो होतो. मी युरोपमधुन बिग बॉसचा प्रत्येक एपिसोड पाहात होतो आणि घरातील सर्व सदस्यांना मिस करत होते." असं सांगितले त्यानंतर घरातील सर्वसदस्यांचं रितेश देशमुख यांनी स्वागत केले. यंदाच्या बिग बॉस मराठीचं संपूर्ण सु्त्रसंचालन रितेश भाऊंनी केलं आहे. प्रेक्षकांना रितेशभाऊंची होस्टिंग भरपूर आवडली आहे.

आता नेमकं बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनचा विजेता लवकरच ठरणार आहे. बिग़ बॉसची ट्रॉफी नेमकं कोणत्या सदस्याच्या हातामध्ये जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. रितेश भाऊंनी सर्व फायनलिस्ट सदस्यांना शुभेच्छा दिल्या आणि यंदाच्या बिग बॉसच्या सीझनचे भरभरुन कौतुक केले आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT