Ankita Walawalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: सूर जुळले… बिग बॉस फेम अंकिता वालावलकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा?

Kokan Hearted Girl Ankita Walawalkar: बिग बॉस मराठी फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील अंकिताची खेळी प्रेक्षकांच्या पंसतीस आली

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील अंकिताची खेळी प्रेक्षकांच्या पंसतीस आली. बिग बॉस मराठी यंदाच्या सीझनमध्ये अंकिता वालावलकर टॉप ५ मध्ये होती. सध्या अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

बिग बॉसच्या घरात असताना अंकिताने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. अंकिताने बिग बॉस संपल्यानंतर लवकरच लग्नबंधनात अडकणार असण्याची माहिती दिली होती. अशातच अंकिताने आता फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.

सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर अंकिता वालावलकरने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अंकिताने सूर जुळले असं कॅप्शन दिलं आहे. अंकिताच्या नवऱ्याचं नाव कुणाल भगत आहे. अंकिता तिच्या गावी सिंधूदुर्गमध्ये लग्न करणार असल्याचं बोलली होती. दरम्यान अंकिता मुंबईत रिस्पेशन ठेवणार आहे. अलिकडेच पोस्ट करत अंकिताने केळवणाला सुरूवात झाल्याचे सांगितले होते.

सोशल मीडियावर अंकिताच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी "खुप छान जोडी" अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने, "आम्हाला आमचे भावोजी दिसले तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला एवढी सुंदर आणि सुसंस्कृत तेवढीच रोकठोक जोडीदार मिळाली"

कोण आहे अंकिताचा नवरा?

कुणाल भगत हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मालिका अन् चित्रपटामध्ये कुणालने दिग्दर्शन केले आहे. अंकिता व कुणालने एकत्र गाण्यात देखील काम केले आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिताच्या नवऱ्याला चाहते कोकण हार्टेड बाय या नावाने ओळखतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

SCROLL FOR NEXT