Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: "भाऊचा धक्का नाही, भाऊला निक्कीचा पुळका", रितेश देशमुखवर नेटकरी संतापले

Bigg Boss Marathi: बिग बॉस घरातील वातावरण प्रेक्षकांना आवडत नसल्याचं दिसत आहे.बिग बॉस होस्ट रितेश देशमुखवर नेटकरी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Manasvi Choudhary

मराठी मनोरंजनविश्वात बिग बॉस मराठी सध्या तुफान गाजतंय. पहिल्या दिवसांपासून हा शो चर्चेत आहे. यंदा बिग बॉसच्या शोने टिआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडीस काढले आहेत. बिग बॉसच्या घरात दररोज नवनवीन टास्क पाहायला मिळतो. मात्र आता बिग बॉस घरातील वातावरण प्रेक्षकांना आवडत नसल्याचं दिसत आहे.बिग बॉस होस्ट रितेश देशमुखवर नेटकरी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर बिग बॉसचा आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. "निक्कीला विजयी करून शो संपवा... असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर आणखी एकाने म्हटलं की रितेश भाऊंना निक्कीला जिंकवायचं आहे म्हणून ते तिची एकही चूक सांगत नाही. अश्या प्रतिक्रया दिल्या आहेत.

बिग बॉस या कार्यक्रमावर सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. बिग बॉसच्या घरात सुरू असलेली निक्कीची खेळी प्रेक्षकांना आवडच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे. "रितेश सर तुम्ही नेहमी निकीची बाजू का घेता मॅटर काय आहे असं म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने, रितेश सर तुम्ही नेहमी निकीची बाजू का घेता मॅटर काय आहे? अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT