New Bigg Boss Logo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'अब मजा आयेगा ना भिडू' बिग बॉसच्या घरातील ट्विस्टने स्पर्धकही हैरान...

गेल्या २ ऑक्टोबरपासून सुरु झालेला 'बिग बॉस मराठी' चा खेळ संपायला आता अवघे काही दिवसच बाकी आहेत. सध्या फक्त एकूण ८ स्पर्धकच उरले आहेत.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: गेल्या २ ऑक्टोबरपासून सुरु झालेला 'बिग बॉस मराठी' चा खेळ संपायला आता अवघे काही दिवसच बाकी आहेत. सध्या फक्त एकूण ८ स्पर्धकच उरले आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण २ स्पर्धकांना घराबाहेर जावे लागणार आहे. त्यातील एका स्पर्धकाला कालच बाहेर जावे लागले आहे, पण आज कोणता स्पर्धक जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. डबल एलिमिनेशन बिग बॉसच्या घरात या आठवड्यात पार पडणार आहे.

आजच्या होणाऱ्या चावडीवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. नुकताच शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये चावडीवर सर्व स्पर्धकांनी चांगलीच धम्माल मस्ती करताना दिसले. सोबतच बिग बॉसच्या राडे ही होताना दिसले. आजच्या चावडीवर मांजरेकरांनी सर्व स्पर्धकांना 'एकच फाईट वातावरण टाईट' हा टास्क दिला आहे. ज्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाने आपल्या ना आवडत्या स्पर्धकाचे नाव घेत नावडती गोष्ट सांगत फाईट मारायची आहे.

व्हिडीओमध्ये, अपूर्वा अक्षय केळकरला मारते, कारण, जर एखाद्या व्यक्तीला सांगून पण कळत नसेल तर मग, अमृता धोंगडे प्रसादला म्हणते तू माझ्याशी का बोलत नाही, तर राखी सावंत कॉफी दे म्हणत अपूर्वाला फाईट मारते. ती म्हणते तू जिंकली मी हारले तरी मी तुझीच धुलाई करणार आहे. त्यामुळे 'एकच फाईट वातावरण टाईट' या टास्कमुळे सदस्यांमध्ये नक्कीच चांगली जुंपणार हे नक्की.

सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात अपूर्वा नेमळेकर, अमृता देशमुख, अमृता धोंगडे, राखी सावंत, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले आहेत. आता आज कोणता सदस्य बाहेर पडणार ? की यामध्ये कोणता नवा ट्विस्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार हे आजच्या भागातच कळेल. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोवरुन आजच्या भागात खूपच ट्विस्ट आणि टर्न पहायला मिळणार हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT