मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसनं दिला आश्चर्याचा धक्का, तेजस्वीनीला दाखवला घराबाहेरचा रस्ता

किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे यांना अश्रू अनावर झाले.

Pooja Dange

Bigg Boss Marathi 4 Update: 'बिग बॉस मराठी 4'मध्ये एका नवीन पर्वाला सुरूवात झाली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये चार चॅलेंजर्सची एन्ट्री झाली आहे. हे चार चॅलेंजर्स 'बिग बॉस 4'मध्ये जरी नवीन असले तरी 'बिग बॉसच्या खेळामध्ये नवीन नाहीत. राखी सावंत ही विविध भाषेतील 'बिग बॉसमध्ये अनेकदा सहभागी झाली आहे. विशाल निकम हा 'बिग बॉस 3'चा विजेता आहे. लेडी बॉस मीरा जगताप हिने तिच्या पर्वात धुमाकूळ घातला होता. आरोह वेलणकर ज्याने दुसऱ्या पर्वामध्ये सगळ्यांच्या नाकी नऊ आणले होते. या सगळ्यांनी घरातील स्पर्धकांना चांगले धारेवर धरले आहे. हे पर्व आमचे आहे सिद्ध करण्यासाठी 'बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक सज्ज झाले आहेत. असे असताना घरातील सर्व स्पर्धकांना मोठा धक्के बसला आहे.

कालच्या भागामध्ये तेजस्विनी लोणारी हिला घराबाहेर जावे लागले. एका टास्कदरम्यान तेजस्विनीला दुखापत झाली होती. बिग बॉसनी तिला एका आठवड्याचा कालावधी दिला होता. परंतु तिच्या दुखापतीमुळे तिला खेळता येऊ शकत नाही. तसेच तिची दुखापत गंभीर आहे म्हणून बिग बॉसनी तिला घराबाहेर जाण्यास सांगितले. हे ऐकताच तेजस्विनीसह सगळ्याच स्पर्धकांना धक्का बसला.

बिग बॉस यांनी तेजस्विनीला confession रूममध्ये बोलावले. बिग बॉसनी तेजस्विनीला सांगितले की, "तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता, या क्षणी सोडावे लागेल." हे ऐकताच घरात शांतता पसरली. किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे यांना अश्रू अनावर झाले. यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. तेजस्विनीने बिग बॉस यांनी विनंती केली, 'कृपया बिग बॉस मला घरामध्ये राहू द्या, "मी माझ्या जबाबदारीवर घरात राहायला आणि टास्क खेळायला तयार आहे." पण बिग बॉसने याला नकार दिला आणि तिची समजूत काढत तिला घराबाहेर जाण्यास सांगितले. (Bigg Boss Marathi)

रहिवासी संघावर नेम प्लेट लावण्यावरून तेजस्विनी आणि राखीमध्ये वाद झाले होते. परंतु रोहितने मध्यस्थी करत तेजस्विनीची पाटी पहिल्या क्रमांकावर लावली आणि म्हणाला अजून कोणालाही या जागी पाठी राखीने सुध्या मोठ्या मानाने तिची पाटी पहिल्या क्रमांकावर न लावता तिसऱ्या क्रमांकावर ठेवली. तेजस्विनीने जेव्हा तिच्या नावाची पाटी काढली तेव्हा राखी म्हणाली "ही जागा तुझी आहे."

'बिग बॉस मराठी 4' सुरू होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. दिवसेंदिवस हा खेळ अजून रंजक होत आहे. सगळेच स्पर्धक आता या खेळात पुढे गेले आहेत. प्रत्येक स्पर्धकाने स्वतःचा खेळ खेळण्यास सुरूवात केली आहे. यात विकास सुद्धा मागे नाही. अमृता धोंगडेला तेजस्विनीच्या जाण्याने खूप दुःख झाले आहेत. पण हा खेळ थांब नाही. तुम्हाला जिकंण्यासाठी सगळं विसरून पुढे जावेच लागते. आता हे चार चॅलेंजर्स आणि स्पर्धक घरामध्ये काय राडा करणार हे पाहावे लागेल. (TV)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT