Bigg Boss Daily Update Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात 'सोसल तितकंच सोशल', प्रसाद- विकासने दिली मोठी आहुती

आठवड्यात बिग बॉस स्पर्धकांना नवे साप्ताहिक कार्य देणार आहेत. त्या साप्ताहिक कार्याचे नाव 'सोसल तितकंच सोशल' असे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi Latest Update: बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य काही तरी विषयांमुळे चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरातील साप्ताहिक कार्य नेहमीच प्रत्येकाचा चर्चेचा विषय असतो. नुकत्याच झालेल्या चावडीत रुचिरा जाधव ही घरातून बाहेर पडली.

आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून एकूण पाच स्पर्धक बाहेर पडले असून एका स्पर्धकाची वाईल्ड कार्ड म्हणूनही एन्ट्री झालेली आहे. चावडीवर मांजरेकर सर्व स्पर्धकांची एकत्र शाळा घेतात. घरातील सर्वच स्पर्धक गेल्या ४० दिवसांहून अधिक दिवस एकत्र राहत आहेत.

या आठवड्यात बिग बॉस स्पर्धकांना नवे साप्ताहिक कार्य देणार आहेत. त्या साप्ताहिक कार्याचे नाव 'सोसल तितकंच सोशल' असे आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे आजच्या भागात कळणार आहे. पण घरामधील सदस्यांना या आठवड्यात त्यांच्या काही मौल्यवान वस्तू गमवाव्या लागणार आहेत. या टास्कमध्ये सदस्यांचीही कसोटी पणाला लागणार आहे.

आता टीममधील सदस्यांना कोण कोणत्या गोष्टींचे बलिदान द्यायला लागणार हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण सदस्य ते करण्यास तयार होतील का? हा देखील मोठा प्रश्न आहे. #CHALLENGE सदस्य कसे पूर्ण करतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अपूर्वा पदार्थ खाताना दिसत आहे आणि तो काही तितकासा स्वादिष्ट नसणार हे आपल्याला माहितीच आहे. तर अक्षय रोहितला सांगतो की, रुचिराचा फोटो फाड आणि बॉटल आहे ती नष्ट कर.

तर दुसरीकडे स्नेहलता सदस्यांचे कपडे फाडताना आणि हेअर ड्रायर नष्ट करताना दिसत आहे. विकास आणि प्रसादला अक्षयने खूप मोठं #CHALLENGE दिले - त्याचे म्हणणे आहे डोक्यावर ट्रीमर फिरवून दाखवा. विकास - प्रसाद ते कार्य करता

ना दिसत असले तरी, प्रसाद हे कार्य करताना नाखूश आहे. तरी ही त्याने हे चॅलेंज स्वीकारले. या आठवड्यात टास्कमध्ये पुढे काय काय होणार? सदस्यांच्या कोणकोणत्या गोष्टी पणाला लागणार आजच्या भागामध्येच कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT