Bigg Boss Marathi 4 Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: अमृता देशमुखसमोर विकास मांडणार आपली बाजू, अपूर्वाबद्दल केले खळबळजनक विधान

सध्या बिग बॉसच्या घरात 'सोसल तितकंच सोशल' हा टास्क सुरु झाला आहे. या टास्कची पहिली झलक काल आपण सर्वांनीच पाहिले आहे. यावेळी पहिली फेरी पूर्ण झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi Latest Update: बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक एकमेकांमध्ये बरेच मिळुन मिसळुन खेळत आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात 'सोसल तितकंच सोशल' हा टास्क सुरु झाला आहे. या टास्कची पहिली झलक काल आपण सर्वांनीच पाहिले आहे. यावेळी पहिली फेरी पूर्ण झाली. बिग बॉसच्या घरातील टास्कची चाहूल स्पर्धकांसोबत प्रेक्षकांनाही असते. प्रेक्षक बिग बॉसच्या घरातील सर्वच टास्कसाठी फारच उत्सुक असतात.

कालपासून नव्या साप्ताहिक कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. या साप्ताहिक कार्यादरम्याना स्पर्धकांनी तिथे कहरच केला. तर आजच्या भागात दुसरी टीम काय करणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. काल अपूर्वाने सगळं सहन केलं, तर आज अपूर्वा सगळ्यांना सहन करायला लावणार आहे. त्यामुळे आज बिग बॉसच्या घरात मोठा राडा होणार आहे.

बिग बॉसच्या घरात बऱ्याच स्पर्धकांची मैत्री खूप चांगली आहे. तशीच एक जोडी म्हणजे, अपूर्वा आणि विकासची मैत्री खूप चांगली होती. त्यांच्या मैत्रीत किरण मानेने खूप आडकाठी आलेला दिसून येत आहे. त्याच्या या खेळीमुळे अपूर्वा आणि विकासच्या मैत्रीवर खूपच परिणाम झालेला दिसून येत आहे. त्याच आधारावर आता योगेश आपली बाजू अमृता देशमुखच्या समोर मांडताना दिसुन येत आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकास अमृताला त्याच म्हणणं पटवून देताना दिसत आहे. त्याचे म्हणणे आहे, मी खरं सांगतो या घरात मी दाद्या नंतर तिलाच मित्र मानतो. पण कसं आहे ना कोण मला समजवत आहे ना चांगल्यासाठी समजवत आहे वाईट नाही. कारण मी इथे गेम खेळायला आलो आहे. इथे कोण कोणाचं नाहीये. इथे मी दोन व्यक्तींसोबत attach आहे. दाद्या कारण मी त्याला मानतो.

तो creative आहे, त्याचा माईंड मला कळतो. दुसरं अपूर्वा, खेळताना ती १०० टक्के देते. मी अपूर्वाचं कधीच वाईट नाही चिंतणार. मला काय वाईट वाटतं मी तिला इथं दया माया केली, भोळा बनलो तर मी अजून खाली डुबणार आहे. ती पण मला डुबवायला आली आहे, मी पण तिला डुबवायला आलो आहे सिम्पल आहे. गेम गेम आहे. आम्ही दोघे एकेमकांसाठी competitor आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

SCROLL FOR NEXT