New Bigg Boss Logo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: बिग बॉसच्या घरात सलग दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेशनचा धडाका

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण ८ खेळाडूंना नॉमिनेट करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळताना स्पर्धकांच्या चेहेऱ्यावर खूपच भिती दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील (Bigg Boss) काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. शनिवार आणि रविवारी झालेल्या चावडीवर मांजरेकरांनी (Marathi Actors) बऱ्याच स्पर्धकांना खडे बोल सुनावले. मांजरेकरांच्या चावडीनंतर स्पर्धकांच्या खेळण्यात बराच बदल दिसत आहे. खेळ सुरु होताच स्पर्धकांना नॉमिनेशनचा धडाका बिग बॉसने लावला आहे. त्यामुळे खेळताना स्पर्धकांच्या चेहेऱ्यावर खूपच भिती दिसून येत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण ८ खेळाडूंना नॉमिनेट करण्यात आले आहेत. (Marathi Entertainment News)

या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अमृता धोंगडेचा पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर खली म्हणून प्रसिद्ध असलेला योगेश चव्हाणही नॉमिनेशन लिस्टमध्ये चर्चेत आहे. तसेच हॅडसम बॉय, चॉकलेट बॉय अक्षय केळकरही घराच्या बाहेर जाण्यासाठी चर्चेत आहे. पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुखलाही नॉमिनेशन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे.

तसेच आणखी काही सदस्यांचे नॉमिनेशनसाठी नावे आहेत. त्यात 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम निखील राजेशिर्केचीही नॉमिनेशनसाठी निवड केली आहे. परंतू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही त्याची सर्वात मोठी संधी म्हणता येईल. तो स्वत:ला नॉमिनेशनपासून वेगळे ठेवता येईल. रुचिरासोबत तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदेलाही नॉमिनेशन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. पण ते कदाचित दोघेही सेफ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करण्याची शक्यता

Glowing skin: पिंपल फुटल्याने चेहऱ्यावर खड्डे पडलेत? या घरगुती उपायांनी मिळेल सॉफ्ट आणि ग्लोईंग त्वचा

Akola : "नवरदेव तयार आहे, पण..." प्रकाश आंबेडकरांच युतीबाबत मोठं विधान!

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंची तोफ धडाडणार? महापालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी|VIDEO

Back Blouse Design: ब्लाउजच्या गळ्यांचे बॅकलेस सुंदर डिझाइन, प्रत्येक लूकमध्ये दिसाल उठून

SCROLL FOR NEXT