Bigg Boss Marath 4 Bhagy Dile Tu Mala Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस'च्या घरात 'या' पाहुण्यांनी केला प्रवेश, काय असेल त्यांचा खरा गेम

कलर्स मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका 'भाग्य दिले तू मला'मधील कलाकार सदस्यांच्या भेटीला येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Update: सगळीकडेच दिवाळीची उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलेब्रिटीपर्यंत सगळेच दिवाळीमध्ये दंग आहेत. मराठी मालिकांमध्येही दिवाळी साजरी होत आहे आणि सेलिब्रेशनच्या एपिसोडचा प्रेक्षक आनंद घेत आहेत. घरच्यांपासून दूर अनोळखी लोकांसह 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक एक वेगळी दिवाळी साजरी करत आहेत.

'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांना दिवाळी निमित्त अनेक सरप्राईज मिळत आहेत. शनिवार-रविवारी झालेल्या चावडीवर एकमेकांना भेटवस्तू देत स्पर्धकांनी दिवाळीची सुरूवात केली. त्यानंतर तत्यांनी घरासाठी कंदील देखील बनविले. फराळाचा आनंद घेण्यासाठी थेट घराचा फराळ घेऊन मुंबईचे डबेवाले थेट 'बिग बॉस'च्या घरात गेली. स्पर्धकांनी या फराळाचा आनंद घेतला. (Diwali)

जसे सणासुदीला सगळ्यांच्या घरात पाहुणे येतात. तसेच पाहुणे आता 'बिग बॉस'च्या घरात सुद्धा येणार आहेत. कलर्स मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका 'भाग्य दिले तू मला'मधील कलाकार सदस्यांच्या भेटीला येणार आहेत. राजवर्धन आणि कावेरी दिवाळी निमित्त सदस्यांना भेट देणार आहेत. घरात आलेल्या पाहुण्यांना पाहून कलाकार खूप खुश झाले आहेत. या पाहुण्यांनी कलाकारांसाठी गिफ्ट सुद्धा आणले आहेत. (Bigg Boss Martahi)

'बिग बॉस मराठी 4'च्या घरात फक्त भांडण होत नाहीत. तिथे प्रेम आणि आनंद देखील पाहायला मिळत असतो. प्रत्येक सण साजरा केला जातो तर पाहुण्यांचे मोकळ्या मनाने स्वागत केले जाते. घरात आल्यावर राजवर्धन आणि कावेरी यांनी सदस्यांसह कसा वेळ घालवला हे आपल्याला या आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नव्या विहिरीसाठी सरकार देतंय ४ लाखांचं अनुदान, दुरुस्तीसाठी मिळतंय अर्थसहाय्य, कुठे कराल अर्ज?

Maharashtra News Live Update: बॅलेट पेपरवर निवडणूका व्हाव्यात ही मागणी - राज ठाकरे

Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Badlapur Video : बदलापूर स्कायवॉकवर जोडप्याचा 39 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, महिलेला कोण मारहाण करतंय?

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

SCROLL FOR NEXT