Bigg Boss Marathi Latest Update Instagram/ @bbmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: घरात स्पर्धकांसोबत योगेशला असभ्य वर्तवणूक पडले महागात, बिग बॉसच्या घराला करावे लागले बाय बाय

बिग बॉसचा तिसरा आठवडा संपला. शेवटी तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे प्रत्येक सदस्याला वाटते. पण आज घरातून तिसरा स्पर्धक एक्झिट घेणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Latest Updates: हिंदी बिग बॉसप्रमाणे मराठी बिग बॉसचे घर स्पर्धकांमुळे बरेच चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला बिग बॉस देत असलेल्या टास्कने घरात स्पर्धकांमध्ये चांगलेच खटके उडत आहेत. हे खटके असे उडतात की, खुद्द बिग बॉसलाही यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो.

ज्या स्पर्धकाचे खेळताना काही चुकल्यास त्याची चुक मांजरेकर चावडीवर समाजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. चावडी प्रत्येकाच्या आवडीची आहे. चावडीसाठी स्पर्धकांसोबत प्रेक्षकही आतूर असतात. नुकतीच या चावडीत अनेक स्पर्धकांच्या खेळाची मांजरेकरांनी दखल घेतली.

बिग बॉस मराठीच्या नुकत्याच झालेल्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी किरण मानेची चांगलीच कानउघडणी केली. मांजरेकरांनी चावडीवर बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली, कोण कुठे चुकले ? तर कोण बरोबर खेळले सगळ्याचा हिशोब चुकता केला.

सदस्यांच्या वर्तणुकीसाठी त्यांनी स्पर्धकांना चांगलंच सुनावले. पण यावेळेस महेश मांजरेकरांचा ओरडा नक्की कोणत्या सदस्याला मिळेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. किरण माने यांच्या बऱ्याच गैरसमजुती महेश मांजरेकरांनी दूर केल्या. तसेच विकासाला त्याचे खेळू दे असा सल्ला देखील दिला.

मांजरेकर किरणला बोलतात, 'मी सगळं बघतोय. इथे सगळेच खेळायला आलेत. तिथे कुणाचं वैयक्तिक भांडण नाहीये. मी काय त्यांच्यावर रोल फेकतो. तू कुणाची लायकी काढतोस? तू स्वतः काय आहेस? मी बॅग घेऊन घराबाहेर काढेन तुला'. या शब्दात मांजरेकरांनी योगेशला खडसावून सांगितले.

याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अक्षय आणि अपूर्वा किरण मानेवर भडकल्याचे दिसून आले तर अमृता देशमुखने देखील किरण मानेंनी केलेल्या वक्त्यावर नाराजी दर्शवली. शेवटी तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे प्रत्येक सदस्याला वाटत असते. विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये आले ज्यामधून योगेश जाधवला घर सोडावे लागले.

तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून स्नेहलता वसईकर बिग बॉसची स्पर्धक म्हणून खेळणार आहे. आता नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील ? नात्यांमध्ये काय बदल होणार ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल ? कोण होईल घराचा नवा कॅप्टन ? नक्कीच येणारा आठवडा खूप आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT