Amruta Dhongade and Kiran Mane Fight  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'विश्वासघातकी आहे ही मुलगी' किरण मानेंचा अमृता धोंगडेंवर थेट आरोप

अमृता धोंगडे विश्वासघातकी तर किरण माने पळपुटे, विकास समोर प्रश्नचिन्ह.

Pooja Dange

Bigg Boss Marathi 4 Episode Update: 'बिग बॉस मराठी 4' सुरू होऊन ७० दिवस पूर्ण झाले आहेत. या शोमध्ये दर आठवड्याला काहीतरी नवीन पाहायला मिळत असते. स्पर्धकांचा उत्साह वाढवायला कधी सेलिब्रिटी येतात. तर कधी बिग बॉसचे पर्व गाजवलेले स्पर्धक बिग बॉसच्या घरात एन्ट्री करतात. पण आज मात्र बिग बॉसच्या घरात फक्त राडे पाहायला मिळणार आहेत. आधी अक्षय आणि प्रसाद यांचे भांडण आणि त्यानंतर किरण माने आणि अमृता धोंगडे याचा वाद. यामुळे घरातील वातावरण वादमय झाले आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये आज विकास, किरण माने आणि अमृता धोंगडे यांच्यामध्ये वाद झाला. अमृता विकासाला अमृता आणि अक्षयविषयी विचार होती. परंतु विकास काही न बोलता दाद्या येऊ दे असेच म्हणत होता. तसेच किरण माने येताच निघून गेला.

अमृता धोंगडे विकासाला विचारताना दिसणार आहे की, विकास तु सांग, तू होतास ना तिथे. मी कधी नाव घेतलं. मी कधी म्हटलं की आपण अक्षय आणि अपूर्वाला घराबाहेर काढायचं. तू मला ठामपणे सांग की त्या दोघांचे नाव घेतलं. दाद्याच्या विचारू नकोस.

यावर विकास तिला काहीही उत्तर देत नाही. तो किरण माने यांना 'दाद्या बोला', असे म्हणतो. किरण माने यावर म्हणतात, विश्वासघातकी मुलीबरोबर मला बोलायचं नाही. दुतोंडी आणि विश्वासघातकी आहे ही मुलगी. अशा पोरीशी काय बोलतोस, मला नाही बोलायचं.

किरण माने यांच्या या बोलण्याने अमृता धोंगडे सुद्धा भडकते आणि म्हणते, 'मला तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाशी बोलायचे नाही. एक नंबरचा खोटारडा माणूस. निघा मग. तू पण हेच करत आला आहेस. पळपुटे.' (Bigg Boss Marathi)

अमृता धोंगडे आता नव्या वादात सापडली आहे. तेजस्विनीशी वाईट वागल्यामुळे अमृता धोंगडे आधीच स्पर्धकांच्या मनातून उत्तरी आहे. भले त्या दोघी पुन्हा मैत्रिणी झाल्या असल्या तरी त्याचे परिणाम तिला सहन करावे लागत आहेत. आता तिच्या टीमच्या इतर स्पर्धकांसोबत देखील तिने पंगा घेतला आहे. या तिघांमधील हा वाद नक्की का झाला? कोणावरून झाला? हे आजच्या भागामध्ये आपल्याला कळेलच. (TV)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

SCROLL FOR NEXT