Bigg Boss Marathi  Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: यशश्री 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर, कोणाला न भेटताच 'टूकटूक राणी' निघाली

हा आठवडा सर्वांसाठी स्पेशल असण्याचे कारण म्हणजे एक ऐवजी दोन स्पर्धक 'बिग बॉस' च्या घरातून बाहेर पडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Latest Update: 'बिग बॉस लवकरच ५० दिवस पूर्ण करणार आहे. तेवढ्या दिवसात 'बिग बॉस मराठी'च्या घरात अनेक तंटे, मस्ती, धम्माल आणि आपापसातील मैत्री ही सर्वांनीच पाहिली. त्यांच्या या मैत्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काल बिग बॉसच्या घरात विकेंड चावडी झाली. त्या चावडीत काही स्पर्धकांना मांजरेकरांनी कान मंत्रही दिले तर काहींना खडेबोल ही सुनावले.

हा आठवडा खूपच वेगळा होता. स्पर्धकांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. या आठवड्यात बिग बॉसने स्पर्धकांना 'सोसल तेवढेच सोशल' हे उपकार्य दिले होते. या उपकार्यात स्पर्धकांनी यशश्री मसुरकर,किरण माने, अमृता देशमुख आणि तेजस्विनी लोणारी यांना डेंजर झोनमध्ये टाकले होते. हा आठवडा सर्वांसाठी स्पेशल असण्याचे कारण म्हणजे एक ऐवजी दोन स्पर्धक 'बिग बॉस' च्या घरातून बाहेर पडणार आहे.

या आठवड्यात विकेंडच्या चावडीवर एका स्पर्धकाला 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. त्या स्पर्धकाचे नाव म्हणजे यशश्री मसुरकर. यशश्री 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर जाणारी सहावी स्पर्धक ठरली आहे. शनिवारी एका स्पर्धकाला घरी जाण्याचा नारळ मिळाला असून रविवारच्या चावडीवर मांजरेकर कोणत्या स्पर्धकाला घरचा नारळ देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यशश्रीला घरातील सदस्यांना शेवटचं भेट असं सांगूनही कोणत्याही स्पर्धकाला ती जाऊन भेटली नाही. 'घरातून बाहेर पडताना मी सदस्यांना भेटली असती तर खूप इमोशनल झाली असती आणि मला रडायचं नव्हतं म्हणून मी कोणाला भेटली नाही.' असं यशश्रीनं महेश मांजरेकरांना स्पष्ट सांगितलं.

विकेंडच्या चावडीवर यशश्रीला घराबाहेर पडावं लागले, तर अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी या दोघी सेफ झाल्या आहेत. आजच्या भागात किरण माने किंवा अमृता देशमुख यांच्यापैकी एक जण आऊट होणार आहे. आजच्या चावडीवर कोणता दुसरा सदस्य घराबाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT