Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss अचानक बंद करण्याचे आदेश, स्पर्धकांचे काय होणार? वाचा नेमकं काय घडलं

Bigg Boss Update : बिग बॉस शो बद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बिग बॉस शो अचानक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉस शो बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पर्यावरणा संदर्भात नियमांचे उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

'बिग बॉस'चे शूटिंग ज्या स्टुडिओमध्ये सुरू आहे, तो स्टुडिओ बंद करण्यात आला आहे.

सध्या सर्वत्र बिग बॉसची (Bigg Boss) चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉस हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. अशात मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस कन्नड' बंद करण्यात आले आहे. 'बिग बॉस कन्नड' या शोचे शूटिंग ज्या स्टुडिओमध्ये सुरू आहे, तो स्टुडिओ बंद करण्यात आला आहे. याचे आदेश कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (केएसपीसीबी) दिले आहेत.

सध्या 'बिग बॉस कन्नड 12' सुरू आहे.'बिग बॉस कन्नड 12' चा स्टुडिओ बंगळुरू दक्षिणमध्ये बिदाडी याठिकाणी आहे. पर्यावरणा संदर्भात नियमांचे उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 'बिग बॉस कन्नड 12' चा स्टुडिओ बंद करण्याचा आदेश 6 ऑक्टोबर रोजी देण्यात आला. KSPCB जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, वेल्स स्टुडिओज अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड येथे सुरू असलेले प्रोजेक्ट तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परिसराला सील करायला सांगितले आहे.

'बिग बॉस कन्नड 12' चे होस्टिंग किच्चा सुदीप करत होते. या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना देखील बंगळुरू इलेक्ट्रिसिटी कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे 'बिग बॉस कन्नड' सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी एक नोटिस प्रसिद्ध करत वेल्स स्टुडियोज अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडला या ठिकाणचं सर्व कामकाज थांबवण्याची सूचना दिली आहे.

या परिसराचा वापर मोठ्या प्रमाणावर मनोरंजन आणि स्टुडियोच्या संचालनासाठी केला जातो. मात्र त्यासाठी पाणी प्रदूषण आणि हवा प्रदूषणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे येथील कामकाज बंद करण्यात आले आहे. येथे कचऱ्याचे व्यवस्थापन देखील योग्य पद्धतीने होत नाही. वेल्स स्टुडियोज अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड येथे अनेक स्टुडियो आहेत. त्यातच 'बिग बॉस कन्नड 12' एक स्टुडियो देखील आहे. मात्र तपासात पाणी आणि हवा प्रदूषणाबाबतच्या नियमांची आवश्यक परवानगी घेण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT