Urfi Javed Green Grass Dress  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed New Fashion: ऊर्फीची फॅशन डिझायनर कोण? शोध घ्या..! कपडे संपले आता थेट आणलं...

कधी सिम कार्ड, तर कधी मोबाईल, तर कधी पानं- फुलं किंवा दोरे असो. अशी फॅशन करत आपली हौस पुर्ण केली. नुकतंच आणखी एक तिने नवी फॅशन केली आहे.

Chetan Bodke

Urfi Javed New Fashion: ‘बिग बॉस-ओटीटी’ फेम उर्फी जावेद नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी जावेद आणि विचित्र फॅशन हे सुत्र फारच जुळलेले आहे. उर्फी जावेद कपड्यांवर सतत हटके प्रयोग करते आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. उर्फीने आतापर्यंत अनेक हटके फॅशन करत आपली हौस पुर्ण केली आहे. कधी सिम कार्ड, तर कधी मोबाईल, तर कधी पानं- फुलं किंवा दोरे असो. अशी फॅशन करत आपली हौस पुर्ण केली. नुकतंच आणखी एक तिने फॅशन केली आहे.

उर्फी जावेदच्या विचित्र फॅशनची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होते. भल्याभल्यांना आपल्या फॅशनने सर्वांनाच गार केले आहे. विचित्र ड्रेसिंग स्टाइल करत सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. आता पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे.

नुकताच उर्फीने एक फॅशन करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी तिने हिरव्या घासाचा ड्रेस बनवून आपली नवी फॅशन केली आहे. तिने, सोशल मीडियावर कॅप्शन देत शेअर केले की, “ आज पर्यावरण दिन आहे! माझी नवी फॅशन, मी हे कशापासून बनवले आहे याचा अंदाज लावा! ”

नेहमी प्रमाणे तिला नेटकऱ्यांनी या ड्रेसवरुन ट्रोल केले आहे. निळ्या रंगाचा तिने फॉर्मल ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. सोबतच त्यावर तिने हिरवा घास देखील लावलेला दिसत आहे.

यावर नेटकरी तिला कमेंट करत म्हणतात, पहा ही पुदिनाची शेती. तर आणखी एक नेटकरी म्हणतात, आतापर्यंत शेतीत घास उगवलेला पाहिला, पण आता उर्फीनेही अंगावर शेती उगवली. तर आणखी एक जण म्हणतो, फॅशनच्या नावाखाली काय करते तुला तरी शोभतं का?, तर आणखी एक जण म्हणतो, फॅशनच्या नावाखाली उर्फी काय करेल कोणास ठाऊक... असं म्हणत तिला यावेळी ट्रोल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यातील बुधवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई

CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSC विरोधात CJP आंदोलन उभारणार?

Sugarcane juice: उसाचा रस प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT