Nikki Tamboli Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli New Car : 'बिग बॉस ' फेम अभिनेत्रीनं घेतली आलिशान कार, किंमत बघून थक्क व्हाल

टीव्ही इंडस्ट्रीसोबतच साउथ सिनेमामधील प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या खूप खूश आहे. बिग बॉस फेम निक्की तांबोळीने नुकतीच एक नवीन आलिशान कार विकत घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीसोबतच साउथ सिनेमामधील प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तंबोळी(Nikki Tamboli) सध्या खूप खूश आहे. बिग बॉस फेम निक्की तंबोळीने नुकतीच एक नवीन आलिशान कार विकत घेतली आहे. घरी नवीन आलिशान कार आणल्यामुळे निक्कीचा आनंद गगनात मावेनासा झालाय. नवीन कार विकत घेतल्यानंतर निक्कीने कारसोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. निक्कीने पांढऱ्या रंगाची मर्सिडीज बेंझ(Mercedes-Benz) विकत घेतली आहे. नवीन आलिशान कार घेतल्याचा आनंद ती तिच्या वडिलांसोबत साजरा करताना दिसत आहे.

अभिनेत्री निक्की तंबोळीने तिच्या नवीन मर्सिडीज-बेंझ या कारचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यापासून तिचा हा फोटो प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निक्की तंबोळीने विकत घेतलेल्या मर्सिडीज बेंझ या कारची किंमत १ कोटी रुपये आहे. मर्सिडीज बेंझ विकत घेतल्यापासून निक्की खूप खुश आहे. हा क्षण स्पेशल करण्यासाठी कार शोरूममध्ये पांढऱ्या, सोनेरी आणि करड्या रंगांचे फुगे लावण्यात आले होते. तसेच तिने आपल्या वडिलांसोबत कारची पूजा करून केक कापून हा आनंदाचा क्षण साजरा केला.

निक्की तंबोळीने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या नवीन कारसोबत फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नेहमी मला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मला कधीही निराश न करण्यासाठी, मी सदैव तुमची कृतज्ज्ञ आहे. मी नेहमी तुमची लहान मुलगीच असेन'. या तिच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबत अनेक टीव्ही सेलिब्रिटी कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. अभिनेता विशाल सिंगने लिहिले की, 'अभिनंदन निक्स, आता लवकरच मला कुठे तरी फिरायला घेऊन जा'. तर अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि जस्मिन भासीनने तिला नवीन कार घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

निक्की तंबोळी तमिळ चित्रपट 'कंचना ३' मध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली होती. त्यानंतर तिने सलमान खानच्या बिग बॉस या रिअलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोची ती सेकेंड रनर-अप होती. ती २०२१ मध्ये रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाड़ी १४' मध्ये देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT