Paras Chhabra and Mahira Sharma Saam TV
मनोरंजन बातम्या

Paras-Mahira Post: शो संपला आणि नातंही संपलं? Bigg Bossमधल्या या लव्हबर्ड्सचं ब्रेकअप

Paras Chhabra and Mahira Sharma: माहिरा आणि पारस यांच्या ब्रेकअप झाल्या असल्याची चर्चा आहे.

Pooja Dange

Paras Chhabra-Mahira Sharma Unfollow On Instagram: माहिरा शर्मा आणि पारस छबडा 'बिग बॉस १३' यामधील खूप गोड जोडी होती. माहिरा आणि पारस एकमेकांचे चांगले मित्र झाले. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोघांनी त्यांचे नाते पुढे नेले.

माहिरा आणि पारस अनेकदा पार्टी करताना आणि एकत्र फिरताना दिसले होते. माहिरा आणि पारस यांनी कधीतरी त्यांच्या नात्याविषयी काहीही सांगितले नाही. त्यांच्या चाहत्यांच्या त्यांच्या नावाचा हॅशटॅग देखील केला होता. दोघेही त्यांच्या सोशल मीडियावर एकत्र अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करायचे.

माहिरा आणि पारस यांच्या ब्रेकअप झाल्या असल्याची चर्चा आहे. माहिरा आणि पारस यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. 'बिग बॉस' संपल्यानंतर माहिरा आणि पारस चंदीगडला गेले. त्यानंतर मुंबईत परतले नाहीत. पंजाबला त्यांचे के मोठ्या प्रोजेक्टचे शूटिंग सुरू होते. गेल्या कित्येक दिवसांपासून दोघांनी एकेमकांसोबत फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले नव्हते.

नुकतेच पाहण्यात आले आहे की, माहिरने तिच्या कथित बॉयफ्रेंड पारसला अनफॉलो केले आहे. दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवरून डिलीट केले आहेत.

काही दिवसांपूर्वी माहिरा मुंबईत शिफ्ट झाली आहे. तिचा वेब शो आणि चित्रपट प्रदर्शित होणार होता तसेच तिचे मुंबईत काम सुरु झाल्याने ती मुंबईत आली आहे. त्यानंतर पारस देखील मुंबईत आला, हे त्याने अधिकृतरीत्या जाहीर देखील केले. एका शहरात असूनही दोघे एकत्र दिसले नाहीत. त्यावरून त्यांचा ब्रेकअप झाल्याचा अंदाज त्यांचे फॅन्स आणि पापाराझीं लावते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

SCROLL FOR NEXT