Jahnavi Killekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jahnavi Killekar Video: 'अशा अफवा पसरवू नका', जान्हवी किल्लेकरची विनंती, काय आहे प्रकरण?

Jahnavi Killekar Video: जान्हवीने एक व्हिडीओ पोस्ट केली. या पोस्टमध्ये जान्हवीनी सर्वांना विनंती केली आहे. काय आहे हा नेमका प्रकार ते जाणून घेऊया.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकर सध्या चर्चेत आहे. जान्हवी सोशल मीडियावर तिचे नवनवीन व्हिडीओ,फोटो पोस्ट करत असते. नुकतेच जान्हवीने एक व्हिडीओ पोस्ट केली. या पोस्टमध्ये जान्हवीनी सर्वांना विनंती केली आहे. काय आहे हा नेमका प्रकार ते जाणून घेऊया.

जान्हवी किल्लेकरची पोस्ट

इन्स्टाग्रामवर जान्हवीने केलेल्या व्हिडीओमध्ये, “हॅलो, व्हिडीओ बनवण्यामागचं कारण असं आहे की, मी आता एक नुकतीच अफवा वाचली. तसंच बरेच लोक फोन करूनही सांगतायत, मेसेजही येतायत. त्यामुळे मी आता स्वतःहून पाहिलं. उगाच अशी बातमी पसरली आहे की, जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात घातलेल्या कपड्यांचा लिलाव करणार आहे. १०० कपडे आणि ४० नाइड ड्रेसचा ती लीलाव करणार आहे, असं म्हटलं जातंय. तर या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे? ठीक आहे. मी १०० कपडे आणि ४० नाइट ड्रेस घेतले. ते मी वापरेन. मी त्याचा लीलाव का करेन."

" प्लीज माझी विनंती आहे अशा काहीही अफवा पसरवू नका. मला माझे कुठलेही कपडे विकायचे नाहीयेत. तसंच ते विकण्यासारखे नाहीयेत. ते माझे कपडे आहेत. ते मी कपडे का विकू? ते काही महागडे आणि खूप ग्रेट असे कपडे नाहीयेत. त्यामुळे प्लीज उगाच काहीही अफवा पसरवू नका, ही माझी विनंती आहे.” असं म्हटलं आहे.दरम्यान अलिकडेच जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या घरातील तिच्या दररोजच्या ड्रेसिंग स्टाईलबद्दल व्यक्त झाली होती. यामुळेच बिग बॉसच्या घरातील तिच्या कपड्याचं लिलाव करणार अशा अफवा सुरू झाल्या."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT