Indrayani Serial Promo Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Irina Rudakova: 'गावात आली गोरी बाई...' बिग बॉस फेम इरिनाची इंद्रायणी मालिकेत एन्ट्री

Indrayani Promo Out: 'इंद्रायणी' मालिकेत 'बिग बॉस मराठी' स्पर्धक इरिना रूडाकोवाची एण्ट्री झाली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेली परदेशी गर्ल इरिना रूडाकोवा लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील 'इंद्रायणी' या लोकप्रिय मालिकेत इरिना दिसणार आहे. सोशल मीडियावर इरिनाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळेच मालिकेत आता नवीन ट्विस्ट काय असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकताच कलर्स मराठीवर इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो शेअर झाला आहे. ज्यामध्ये बिग बॉस फेम इरिनाची इंद्रायणी मालिकेत एन्ट्री झाल्याचं दिसतय. प्रोमोमध्ये, विठूच्या वाडीत आलेली एक गोरीपान फॉरेनर दिसत आहे. तिचं परीसारखं रूप, सोनेरी केस अशा सर्वच गोष्टींची विठूच्या वाडीला भूरळ पडलेली पाहायला मिळत आहे. ही परी दुसरीतिसरी कोणी नसून 'बिग बॉस मराठी' फेम इरिना रूडाकोवा आहे. इरिनाच्या येण्याने 'इंद्रायणी' मालिकेत काय गमतीजमती घडतात? तिची डॉक्यूमेंट्री पूर्ण होणार की नाही? इंदू आणि इरिनाची मैत्री होणार का? तसेच इरिना कीर्तनही शिकणार का? या सर्व गोष्टी 'इंद्रायणी' मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

'इंद्रायणी' या मालिकेबद्दल बोलताना इरिना रूडाकोवा म्हणाली,"इंद्रायणी' ही मालिका माझ्यासाठी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. मालिकेतील माझं पात्र खूप गोड आणि सकारात्मक आहे. त्यामुळेच हे पात्र मला खूप भावलं. सेटवरील सगळ्यांसोबत काम करताना मजा येतेय. मजा करण्यासह इथला प्रत्येक जण खूप मेहनतीने काम करत आहे".

इरिना पुढे म्हणाली,"मालिकेत 'इंद्रायणी'च्या भूमिकेत दिसणारी चिमुकली म्हणजेच सांची भोईर खूपच गोड आहे. तिच्यासोबत काम करतानाचा अनुभवदेखील खूप कमाल आहे. तिच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 'इंद्रायणी' ही मालिका आता माझ्या खूप जवळची झाली आहे. सेटवर मिळणारं प्रेम आणखी छान काम करण्याचं प्रोत्साहन देत आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबियांसोबत दररोज 'इंद्रायणी' मालिका नक्की पाहावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT