Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Winner: 'निक्की ट्रॉफी जिंकली तर.... ' आर्याने सांगितला बिग बॉसच्या घरातला तो 'गेम'

Bigg Boss Marathi Season 5: काही दिवसांत बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे. बिग बॉस मराठी सीझन ५ ची यंदाची ट्रॉफी निक्की जिंकली तर... असा प्रश्न विचारण्यात आला.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीच्या घरातून अनेक स्पर्धक बाहेर पडले आहेत. बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्यात आर्या जाधवने घराचा निरोप घेतला. बिग बॉस मराठीमधून आर्या अचानक बाहेर पडल्यानंतर सर्वत्र नाराजीचा सूर पाहायला मिळाला. आर्या घराबाहेर येताच आर्याने माध्यमाना मुलाखती दिल्या.

नुकताच सकाळ प्रिमियर चॅनलला आर्याने मुलाखत दिली. यावेळी आर्याला काही दिवसांत बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे. बिग बॉस मराठी सीझन ५ ची यंदाची ट्रॉफी निक्की जिंकली तर... असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आर्याने तिची प्रतिक्रिया दिली, आर्या म्हणाली ती जिंकणार नाही.आणि जर ती यंदाची ट्रॉफी जिंकली तर, मी यापुढचा बिग बॉस मराठीचा शो पाहणार नाही असं म्हटंली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात सातव्या आठवड्यात टास्कदरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये झटापटी झाल्या. या टास्कदरम्यान निक्किने केलेल्या धक्काबुक्कीनंतर आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावली. यानंतर अचानक आर्याला बिग बॉस यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

बिग बॉस मराठी’च्या पाचवा सीझन लवकरच संपणार असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आता अधिकृतपणे माहिती समोर आली आहे. बिग बॉसचा मराठी सीझन ५ ग्रँड फिनाले म्हणजेच महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वात कोण विजयी ठरणार हे जाहीर केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT