Ankit Gupta Instagram @6_ankitgupta
मनोरंजन बातम्या

Ankit Gupta: अंकित गुप्ताच्या व्हिडिओतील मिस्ट्री गर्ल कोण? अभिनेत्यानेच केला चाहत्यांसमोर खुलासा...

अंकितने स्वतः इन्स्टाग्राम लाइव्हवर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य सांगितले आहे.

Pooja Dange

Ankit Gupta Mystery Girl: बिग बॉस 16 चा स्पर्धक अंकित गुप्ता एलिमिनेट झाला आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या खोलीत एक महिला त्याच्यासोबत दिसत होती. अंकितसोबत दिसणारी मुलगी कोण आहे हे त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे होते.

अंकिताने त्याच्या रूममध्ये मुलगी होती असे सांगितले आहे. त्याच्या खोलीत दिसलेली ती मुलगी कोण आहे याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले आहे. अंकितने स्वतः इन्स्टाग्राम लाइव्हवर व्हायरल व्हिडिओचे तपशीलवार वर्णन केले. पाहूया अंकित गुप्ता काय म्हणाला या व्हिडिओमध्ये. (Social Media)

अंकित गुप्ताची एक क्लिप ट्विटरवर व्हायरल झाली होती ज्यामध्ये तो हॉटेलच्या खोलीत झूमद्वारे मुलाखत देत होता. या मुलाखतीदरम्यान त्याच्या खोलीतील बेडवर एक मुलगी दिसली. त्यानंतर अंकितवर विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. प्रियंका चहर चौधरीचे कार्ड कट झाले आहे, अशी प्रतिक्रिया लोक देऊ लागले होता. आता या सर्व प्रकरणावर अंकिताने स्पष्टीकरण दिले आहे.

अंकित गुप्ताने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. या संवादात एका चाहत्याने विचारले की हॉटेलमधील ती मुलगी कोण होती? यावर अंकितने सर्व काही सविस्तर सांगितले. तो म्हणाला, मला स्पष्ट करायचे आहे. मी काही ट्विट वाचले होते की लोकांनी माझ्या मुलाखतीत एक मुलगी पाहिली. ती मुलगी माझी मॅनेजर दिशा आहे. (Celebrity)

अंकित गुप्ता पुढे म्हणाले, त्या मुलाखतीदरम्यान माझी ५ जणांची टीम रूममध्ये उपस्थित होती. मॅनेजर, पीआर आणि इतर काहीजण होते. समजून घ्या की ती 22 वर्षांची मुलगी आहे. ती माझी सगळी कामं सांभाळते. ती माझ्या लहान मुलीसारखी आहे. ती खूप हुशार आहे आणि म्हणूनच ती माझ्या सर्व कामांची काळजी घेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT