Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : 'बिग बॉस'च्या प्रोमोचा व्हिडिओ आला; सलमान खानचं 'भविष्य' दिसलं!, VIDEO बघा

Salman Khan : बिग बॉस 18 प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भाईजानला देखील बिग बॉसच्या चक्रव्यूहाचा सामना करावा लागणार आहे. रंजक व्हिडिओ पाहा.

Shreya Maskar

6 ऑक्टोबर पासून बिग बॉस 18 (Bigg Boss 18) सुरु होत आहेत. अनेकजण या सीझनची आतुरतेने वाट पाहात होते. बिग बॉसने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात शो च्या प्रीमियरची झलक पाहायला मिळत आहे. सलमान खानचे भूतकाळ , भविष्यकाळातील रूप येथे पाहायला मिळत आहे.

आता बिग बॉस शो च्या लाँचच्या दिवशी बिग बॉस सलमान खानला (Salman Khan) त्याचा भूतकाळ आणि भविष्य दाखवला असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन व्हिडिओमध्ये सलमान खानच्या समोर दोन स्क्रीन असून एकात तरुणपणाची झलक तर दुसऱ्यात म्हातारपणाची झलक पाहायला मिळत आहे.

बिग बॉसचा पहिला प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना शो ची उत्सुकता लागली आहे. हा वेळेचा गेम नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने बिग बॉस सुरु होण्याची वाट पाहत आहेत. यंदा बिग बॉसच्या घरात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. बिग बॉस 18 मध्ये तुम्हाला भरपूर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पाहायला मिळेल.

"बिग बॉसच्या चक्रव्यूहातून सलमान खानही सुटलेला नाही. मग स्पर्धकांचे काय होणार आहे?" असे हटके कॅप्शन व्हिडिओ देण्यात आले आहे. तिन्ही काळातील सलमान खान एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून शकता की, भाईजानचा भूतकाळ त्याला विचारत आहे की, तो कुठे आहे? सलमान सांगतो की तो कन्फेशन रूममध्ये आहे. तेव्हा भविष्यातील सलमान विचारतो की, तो तिथे काय करतोय? यावेळी तू कोणती चूक केलीस? त्यावर वर्तमानातील सलमान म्हणतो की, ना तेव्हा त्याने काही केले होते ना आज काही केले आहे. तेव्हा पुन्हा भविष्यातील सलमान म्हणतो की, प्रेमाने समजत नसेल तर थापा मारून समजावतो. मी बिग बॉस ३० साठी शूटिंग करत आहे. असे भविष्यातील सलमान खान स्क्रीनवर सांगतो. कारण आज वाढदिवस आहे. असा रंजक संवाद तुम्हाला येथे पाहा मिळत आहे. सध्या सोशल मिडियावर बिग बॉस 18 मध्ये कोणते सदस्य पाहायला मिळणार याची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Decisions : राज्य सरकारचा मोठा निर्णय; भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकऱ्यांना दिलासा, या योजनेला ३ वर्षे मुदतवाढ

Maharashtra News Live Update: तिलारी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे घोटगे-परमे पूल पाण्याखाली

Skin Care: महागडे टोनर नको! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी तयार करा गुलाबपाणी; त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो

काँग्रेस प्रसिद्धीसाठी खालच्या स्तरावर उतरलीय; मुख्यमंत्री फडणवीस संतापले

Dark Underarms: अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय करताय? डॉक्टरांनी सांगितल्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT