Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: 'बिग बॉस'च्या लाडक्या श्रुतिकाला मिळाला मोठा अधिकार, केलं 'या' सदस्यांना नॉमिनेट, कोण होणार घराबाहेर?

Bigg Boss 18 Latest Update : 'बिग बॉस 18'चा हा तिसरा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात घरातून कोण नॉमिनेट झाले जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या गाजत आहे. हा बिग बॉसचा तिसरा आठवडा सुरू आहे. बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच घरात वाद पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात या आठवड्याचा नॉमिनेशन (Nominated) टास्क पार पडला

बिग बॉसने तिला नवी लाडकी म्हणून घोषित केले. त्यामुळे 'बिग बॉस'ने श्रुतिका अर्जुन एक खास अधिकार दिला होता. यात तिला कोणत्या सदस्यांनी किती जणांना नॉमिनेट करणारायचे हे ठरवायचे होते. यामुळे श्रुतिकाने करणवीर मेहरा (Karan Veer Mehra) , शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) आणि सारा अरफीन खान यांना सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला. तर दुसरीकडे श्रुतिकाने ॲलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा यांच्याकडून सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार काढून घेतला.

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात विवियन डीसेना (Vivian Dsena) , अविनाश मिश्रा (Avinash Mishra ) , मुस्कान बामणे, रजत दलाल आणि नायरा बॅनर्जी हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांमधून कोणाला बिग बॉसचे घर सोडून जाव लागणार आणि कोण या घरात आपला खेळ खेळणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'बिग बॉस 18' च्या घरात आता दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे. एका गटामध्ये करणवीर मेहरा,शिल्पा शिरोडकर, सारा अरफीन खान तर दुसऱ्या गटात ईशा सिंह, अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, ॲलिस कौशिक, तजिंदर बग्गा हे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT