Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: बिग बॉस 18 मध्ये नेमकं काय घडणार? सलमान ऐवजी रवि किशन करणार होस्ट

Bigg Boss 18: रविवारी बिग बॉसच्या घरात सदस्यांची शाळा घेताना सलमान खान दिसणार नाही. यामागचं काय नेमकं कारण आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस 18 च्या पर्व चांगलच सुरू आहे. बिग बॉसच्या घरात दर शनिवारी आणि रविवारी वीकेंड का वार सुरू असतो. सलमान खान सदस्यांची शाळा घेताना दिसायचा. मात्र आता रविवारी बिग बॉसच्या घरात सदस्यांची शाळा घेताना सलमान खान दिसणार नाही. यामागचं काय नेमकं कारण आहे.

नुकताच बिग बॉस 18 चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यंदा वीकेंड का वार शुक्रवारपासूनच असणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी सलमान खान होस्टिंग करणार आहे. तर रविवारी स्पेशल होस्ट म्हणून रवि किशन सदस्यांची शाळा घेणार आहे. त्याचबरोबर वीकेंड का वारच्या वेळेतही बदल करण्यात आलेला आहे.

बिग बॉस 18 च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये रवि किशन पोलिसाच्या पोशाखात बुलेटवरून 'बिग बॉस' च्या घरात एन्ट्री करत आहेत. रवि किशनचे जोरदार स्वागत होत आहे. त्यानंतर सदस्यांबरोबर रवि किशन भोजपूरी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. पुढे रवि किशन कुटुबांतील सदस्यांची प्रश्न- उत्तरांची शाळा घेताना दिसत आहे.

मागील आठवड्यात एका ऐवजी दोन स्पर्धक घराबाहेर गेले. मुस्कान बामने ही सदस्यांच्या बहुमताने घराबाहेर गेली. तर प्रेक्षकांच्या मताने नायरा बनर्जी घराबाहेर गेली. त्यानंतर चौथ्या आठवड्यात शहजादा धामी घराबाहेर झाला आहे. तसेच दोन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री केली. दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूरची ‘बिग बॉस १८’च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली आहे. शोमध्ये एन्ट्री करताच दिग्विजय आणि कशिशमध्ये राडा सुरू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT