Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18' चा पहिला 'टाइम गॉड' कोण? 'या' सदस्याने मारली बाजी

Bigg Boss 18 First Captain : 'बिग बॉस 18' चा पहिला कॅप्टन कोण झाला आणि नेमका कॅप्टनसी टास्क काय होता, जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. आता बिग बॉसच्या घरात पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला. या शो मध्ये यंदा तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. जे प्रेक्षकांचे पहिल्या दिवसापासून मनोरंजन करत आहेत.

कॅप्टनसी टास्कमध्ये सदस्यांनी एका सदस्याला बाद करायचे होते कारण तो पुढे 'टाइम गॉड' होणार होता. या टास्कमध्ये बाद करणाऱ्या सदस्याच्या नावाची बाहुली राक्षसच्या जिभेवरील खिळ्याने लावायची होती. या टास्कच्या पहिल्या फेरीत नऊ सदस्य गेले. तर दुसऱ्या फेरीत आठ सदस्य गेले. शेवटी अरफीन खान (Arfeen Khan) यांनी बाजी मारली तो 'बिग बॉस 18' घराचा पहिला कॅप्टन झाला. या आठवड्यात अरफीन खान हा 'टाइम गॉड' ठरला.

'बिग बॉस 18' च्या घरात आता तजिंदर, श्रुतिका, हेमा, रजत, शिल्पा, चाहत,करण, मुस्कान हे आठ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तर गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याची चर्चा सुरू आहे. कारण ते उच्च न्यायालयात केस सोडून बिग बॉसच्या घरात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे देखील मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. सलमान खान या शोच दमदार होस्टिंग करताना पाहायला मिळत आहे. पहिला वीकेंडचा वार सर्वत्र खूप गाजला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या आठवड्यातील वीकेंड वारची उत्सुकता लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gondia News : आमदार चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश; मोरगाव अर्जुनीत तिरंगी लढत होण्याची शक्यता

Maharashtra News Live Updates: शेकापचे जयंत पाटील घेणार शरद पवारांची भेट

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरला मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा? केंद्र सरकार मोठ्या तयारीत; वाचा सविस्तर माहिती

IND vs NZ, 2nd Test, Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, १६ धावांवर टीम इंडियाने गमावली १ विकेट

Maharashtra Election : मोठी बातमी! राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी, नेमकी कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT