Bigg Boss 18 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: "सलमान खानशी पंगा घेतला तर...", हेमा असं काय म्हणाली, Video होतोय व्हायरल

Bigg Boss 18 Salman Khan: आता पुन्हा हेमा शर्मा चर्चेत आली आहे. हेमाने सोशल मीडियावर धक्कादायक विधान केलं आहे. जे लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस 18 हा शो सध्या चांगलाच गाजताना दिसतोय. या शोमध्ये स्पर्धकांमध्ये रोज राडा होताना दिसत आहे. प्रत्येक स्पर्धक स्वताला सिद्ध करताना आपली मर्यादा सोडत आहे. सध्या शोमध्ये एकीकडे एलिमेशन होत आहे. तर दुसरीकडे, स्प्लिट्सविला 15 चे दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर यांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. अशातच आता पुन्हा हेमा शर्मा चर्चेत आली आहे. हेमाने सोशल मीडियावर धक्कादायक विधान केलं आहे. जे लक्ष वेधून घेत आहे.

बिग बॉसमधून बाहेर पडलेली हेमा शर्मा कायमच व्यक्त होत असते. नुकतंच हेमान बिग बॉस 18 होस्ट सलमान खानबद्दल विधान माडलं आहे. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बिग बॉस 18 लवकर सोडल्याबद्दल हेमा शर्माला पश्चात्ताप होत आहे. नुकतीच एका कार्यक्रमात हेमाने हजेरी लावली होती. ज्यामध्ये सलमान खानचं नाव घेत लक्ष वेधलं. ती म्हणाली, "लोक अनेकदा बोलतात की, सलमान खानशी पंगा घेतला तर माझं करिअर बरबाद होईल. पण मी इतिहास रचला आहे. की माझं करिअर असं असेल की कोणी तसं बनलच नाही आणि बनणारही देखील नाही. धन्यवाद बिग बॉस, धन्यावद सलमान जी."

सोशल मीडियावर हेमाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हाईट आणि ब्ल्यू कलरची साडी नेसली आहे. या साडीवर तिने स्लीव्हलेज खास ब्लाऊज परिधान केलाय. ज्यामुळे तिचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. हलका मेकअपसह हेमाने तिचे केस मोकळे ठेवले आहे.

यापूर्वी हेमा सलमान खानसोबत अनेकदा दिसली आहे. तिने सलमानच्या दबंग 3,यमला पगला दीवना फिर से आणि वन डे:जस्टिस डिलिव्हर चित्रपटांमध्ये काम केले आहे. हेमा अनेक चित्रपटांसह वेबसीरिजमध्ये देखील झळकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT