Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

कॉफीवरून महाभारत, Bigg Boss च्या घरात विवियन अन् कशिशमध्ये मोठा राडा

Vivian-Kashish Fight : बिग बॉसच्या घरात आता पुन्हा नवा वाद पाहायला मिळणार आहे. एका कॉफीसाठी विवियन आणि कशिशमध्ये जोरदार भांडण झाले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18 ) आता दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. रोज घरात नवीन भांडणे पाहायला मिळत आहेत. रेशनवरून भांडणे ही आता बिग बॉसच्या घरात रोजची झाली आहेत. विवियनच्या (Vivian Dsena) कॉफीवरून घरात महाभारत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विवियन आणि कशिशमध्ये (Kashish Kapoor ) मोठे भांडण होताना पाहायला मिळत आहे. विवियनची कॉफी ३ आठवड्यांपासून घरी आली नाही आहे. त्यामुळे त्याची खूप चिडचिड होताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की घरातील सदस्यांना रेशनची काळजी लागून राहिली आहे. तर विवियनला त्याच्या कॉफीची पडली आहे. करणवीर (Karan Veer Mehra) भडकलेल्या विवियनला बोलतो की, "जिथे तीन आठवड्यांपासून कॉफी आली नाही तिथे अजून एक आठवडा त्यात काय..."तर दुसरीकडे दिग्विजय बोलतो की, "कॉफी (Coffee ) प्यायली नाहीस तर मरणार नाही आहेस..."

कॉफीवरून विवियन आणि कशिशमध्ये तर मोठे भांडण पाहायला मिळते. कशिश विवियनला बोलते की, "कॉफी प्यायची असेल तर घराबाहेर जाऊन पी" विवियनने कॉफीवरून भांडण उकरून काढल्यामुळे घरातील सदस्य संतापलेले पाहायला मिळत आहेत. आता बिग बॉसच्या घरात हा वाद कोणत्या टोकाला जाणार आणि घरात रेशन किती येणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच विवियनला कॉफी मिळणार की नाही याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT