Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: 'नींद चुराई मेरी...'अविनाशने शर्टलेस होऊन ईशासोबत केला डान्स, पाहा VIDEO

Avinash- Isha Romantic Dance: सध्या बिग बॉसच्या घरात दमदार मनोरंजनाचे वारे वाहू लागले आहे. करणवीर,चुम दरांग आणि अविनाश-ईशाने घरात रोमँटिक डान्स केला आहे.

Shreya Maskar

बिग बॉसने (Bigg Boss 18) घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे. ज्यात सदस्यांचा राँमेंटिक अंदाज पाहायला मिळत आहेत. अविनाश मिश्रा-ईशा सिंहने घरात मस्त राँमेंटिक गाण्यावर डान्स केला आहे. तर दुसरीकडे करणवीर मेहरा-चुम दरांगने देखील कपल डान्स केला आहे. बिद बॉसच्या घरात या दोन जोड्यांची सध्या हवा पाहायला मिळत आहे. अविनाश आणि ईशा सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये बेड केंद्रस्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही जोड्या बेडवर उभ्या राहून डान्स करत आहेत. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अविनाश मिश्रा (Avinash Mishra) शर्टलेस होऊन ईशा सिंहसोबत (Isha Singh ) डान्स करत आहे. डान्स करताना ते एकमेकांमध्ये मग्न झालेले पाहायला मिळत आहे. अविनाश आणि ईशा 'नींद चुराई मेरी' या गाण्यावर डान्स करत आहे. तर दुसरीकडे करणवीर मेहरा (Karan Veer Mehra) आणि चुम दरांग (Chum Darang ) हे दोघे 'द हम्मा' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. घरातील सदस्यांना करणवीर आणि चुम दरांगचा डान्स खूप आवडला आहे. कारण त्यांनी बेडवर धमाल केली आहे. उड्या मारल्या आहेत. तसेच करणवीर चुम दरांगला उचलून देखील घेताना दिसत आहे.

सध्या बिग बॉसमध्ये प्रेमाचे वारे वाहे लागले आहेत. एकीकडे अविनाश आणि ईशा घरात कायम एकत्र पाहायला मिळतात. तर दुसरीकडे अनेक दिवसांपासून करणला चुमवरून घरातील सदस्य चिडवत आहेत.

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात अविनाश, ईशा, एलिस, श्रुतिका, अरफीन, शिल्पा आणि शहजादा हे सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यातून कोण घराबाहेर जाणार आणि 'वीकेंड का वार'ला काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकरांचा जन्मभूमीवर खास बहुमान; गोवा राज्य चित्रपट महोत्सवात 'या' पुरस्काराने सन्मानित

Screen time effects on kids: वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिडेपणाची समस्या; कसं कराल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट?

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

SCROLL FOR NEXT