Bigg Boss 17 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'च्या घरामध्ये दिवाळी धमाका, ऐश्वर्या शर्मा आणि मन्नारा चोप्रावर भडकला सलमान खान

Aishwarya Sharma: सलमान खानने यावेळी नीलला सर्वांसमोर नाही तसं बोलणारी त्याची पत्नी ऐश्वर्या शर्मा आणि मन्नारा चोप्राला खडेबोल सुनावले.

Priya More

Bigg Boss 17 New Promo:

प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस १७' च्या या आठवड्यातील 'विकेंड का वार'मध्ये दिवाळी धमाका होणार आहे. या आठवड्यामध्ये ज्या स्पर्धकांनी घरामध्ये राडा केला त्यांची सलमान खान (Salman Khan) शाळा घेणार आहे.

या शोमध्ये स्पर्धकांनी संपूर्ण आठवडाभर खूप गोंधळ घातला. त्यामुळे आता विकेंड वारमध्ये सलमान खानने या स्पर्धकांचे चांगलेच कान टोचले आहेत. सलमान खानने यावेळी नीलला सर्वांसमोर नाही तसं बोलणारी त्याची पत्नी ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आणि मन्नारा चोप्राला (Mannara Chopra) खडेबोल सुनावले.

'बिग बॉस 17'चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे.वीकेंड का वारच्या या प्रोमोमध्ये बिग बॉसचे घर आणि सर्व स्पर्धक दिवाळीसाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. पण आतमध्ये वातावरण खूपच गरम आहे. या वीकेंड का वारमध्ये सलमान खान ऐश्वर्या शर्माच्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित करणार आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, सलमान खान ऐश्वर्या शर्माला म्हणतो, 'ऐश्वर्या शर्मा, तू नीलला अशा टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न करत आहेस की तोही रागवेल. तू त्याचा किती पेशन पाहणार आहेस? नीलचा जो अपमान तू करत आहे तो योग्य नाही. हे एक अतिशय विषारी नाते आहे.' सलमान खानच्या या प्रश्नांवर ऐश्वर्या शर्माकडे काहीच उत्तर नाही. तिच्या चेहऱ्यावर १२ वाजल्यासारखे दिसत आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर ऐश्वर्या शर्मा एकदम शांत दिसत होती. पण या आठवड्यात ती सर्वांवर प्रचंड संतप्त झाल्याचे दिसले. सर्वात आधी ऐश्वर्या शर्माने विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यासोबत खूप भांडण केले. यानंतर ऐश्वर्याने पती नील भट्टसोबत भांडण केले. यावेळी ऐश्वर्या शर्माची भाषा 'चल... मी कोणाचेही ऐकत नाही, तुम्हाला माहिती आहे...' अशी होती. यामुळे नेटिझन्सनी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले.

यानंतर सलमान खान मन्नारा चोप्राची शाळा घेतो. सलमान मनाराला सांगतो, 'हवामान खात्याने पूर येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आम्ही काही बोलण्यापूर्वी पूर येऊन जाऊदे. मुद्दा आमचा नाही, मुद्दा तुझा आहे.' सलमान खानने स्पर्धकांना खडेबोल सुनावल्यानंतर बिग बॉसच्या शोमध्ये कतरिना कैफची एन्ट्री होते. ती जबरदस्त स्टाईलमध्ये डान्स देखील करते. त्याचसोबत भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया देखील शोमध्ये कॉमेडीचा तडका देताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

SCROLL FOR NEXT