vicky jain alegation on munawar faruqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: विकी जैनने नाजिलाच्या रिलेशनशिपवरून मुनव्वर फारुकीवर केले गंभीर आरोप, बिग बॉसच्या कोर्टात सदस्याला न्याय मिळणार का?

Vicky Jain Allegation On Munawar Faruqui: मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानने बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला तेव्हापासून तिचे वैयक्तिक आयुष्य प्रकाशझोतात आले आहे. या दोघांमध्ये पुन्हा एकदा हळूहळू प्रेम खुलत असल्याचे दिसून येत आहेत.

Priya More

Bigg Boss 17 New Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) दिवसेंदिवस आणखी रंगतदार होत चालला आहे. या शोमध्ये सर्व कंटेस्टर आता हळूहळू एकमेकांचे खरे रंग समोर आणताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील सदस्य मुनव्वर फारुकी (munawar faruqui) सध्या चांगलाच चर्चेत आहे. जेव्हापासून मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानने बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला तेव्हापासून तिचे वैयक्तिक आयुष्य प्रकाशझोतात आले आहे. या दोघांमध्ये पुन्हा एकदा हळूहळू प्रेम खुलत असल्याचे दिसून येत आहेत.

बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एका टास्कदरम्यान विकी जैनने स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप ऐकल्यानंतर मुनव्वर भावुक होतो आणि रडू लागतो. बिग बॉस स्पर्धकांना एक टास्क देतात आणि म्हणतात की, सध्या घरामध्ये एक खूपच चर्चित सदस्य आहे. तो म्हणजे मुनव्वर आणि कौतुकाची बाब आहे की घरातील एकही सदस्य या चर्चेतून सुटला नाही. मग आज या सर्व गोष्टींवर बोलून हा मुद्दा संपवूया. या मुद्द्याला न्याय देऊया. काही आरोप असतील तर याला कोर्टातच न्याय देऊया.'

बिग बॉसच्या घरातील कोर्टामध्ये अंकिता मुनव्वरचे वकीलपत्र घेते. मुनव्वर फारुकीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले जाते. मुनव्वरच्या बाजूने अंकिता वकील होते आणि विकी जैन विरुद्ध बाजूने वकील म्हणून बोलतो. मुनव्वर फारुकीवर आरोप करताना विकी जैन म्हणतो की, 'त्याच्या सगळ्याच नात्यांमध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की त्याने या घरात बनवलेली नाती आणि त्याचे बाहेर असलेली नाती खरंच खरी आहेत की नाही? यानंतर अंकिता मुनव्वरचा बचाव करते आणि म्हणते की, 'आपण चुकीचे होतो हे त्याने मान्य केले आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तो आधी खरा होता आणि आता खरा आहे. पण जेव्हा आयशाची गोष्ट येते तेव्हा तो खूप विक होतो. पण तो खोटा नाही.

त्यानंतर विकी जैन म्हणतो की, 'घरामध्ये मुनव्वर निवडक लोकांशी नातं निर्माण करताना दिसला आहे. जे लोकं त्याच्या हो ला हो म्हणत आले. जे लोकं त्याच्या सांगण्यानुसार चालायला तयार आहेत. आता सांगतो की माझं एक नातं आहे. ती अशी आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ही वस्तू तिने दिलेली आहे. जेव्हा तो असं बोलतो ना तेव्हा सर्वांना ते खूप आवडते. पण अचानक एक दिवस माहिती पडते की असं काहीच नाही.

'गेममध्ये सहानुभूती मिळविण्यासाठी मुनव्वरने ब्रेकअप होऊनही नाझिलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे भासवले. तो नझिलाला जिवंत ठेवून अनेकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला चांगल्या मुलाची इमेज मिळवायची होती. पण आएशा आल्यामुळे त्याची ही सर्व इमेज गेली. त्यामुळे आएशाच्या येण्याने मुनव्वरला मोठा धक्का बसला.', असं विकी जैन म्हणतो. हे बोलत असताना एकीकडे आयशा देखील रडताना दिसते. तर दुसरीकडे मुनव्वर देखील उदास झालेला दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT