Bigg Boss 17 House Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' मध्ये यावेळी आहेत ३ घरं, शोमध्ये पहिल्यांदाच असं घडतंय; कोणता कंटेस्टंट कुठे राहणार?

Bigg Boss 17 House: बिग बॉसच्या घरात यावेळी 17 स्पर्धकांनी एन्ट्री केली. घरामध्ये एन्ट्री करताच काही स्पर्धकांनी भांडण करायला देखील सुरूवात केली.

Priya More

Bigg Boss 17 Show:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित शो 'बिग बॉस'चा सीझन 17 (Bigg Boss 17) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो आहे. या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 15 ऑक्टोबरपासून या शोला सुरूवात झाली.

बिग बॉसच्या घरात यावेळी 17 स्पर्धकांनी एन्ट्री केली. घरामध्ये एन्ट्री करताच काही स्पर्धकांनी भांडण करायला देखील सुरूवात केली. नेहमीप्रमाणे यावेळी देखील बिग बॉस शो धमाकेदार ठरणार हे यावरून दिसत आहे.

बिग बॉसचा यंदाचा सीझन हा खूपच खास असणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये यावेळी प्रथमच अनेक गोष्टी घडणार आहेत. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्या यापूर्वीच्या सीझनमधील स्पर्धकांना देण्यात आल्या नव्हत्या. यावेळी सलमान खानच्या शो 'बिग बॉस 17' मध्ये नवीन काय आहे आणि पहिल्यांदाच काय पाहायला मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

'बिग बॉस 17' ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सलमान खानच्या शोमध्ये 17 स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. यावेळी 'बिग बॉस 17' मध्ये स्पर्धकांना तीन घरे आणि फोनची सुविधा मिळणार आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या घरांव्यतिरिक्त स्पर्धकांना फोनही दिले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'बिग बॉस 17' मधील तीन घरांची थीम वेगवेगळी असेल. यावेळी स्पर्धकांना वेगळ्या दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत.

'बिग बॉस 17' या शोमध्ये एका घराची थीम दिल म्हणजेच हृदय आहे, दुसऱ्या घराची थीम दिमाग म्हणजेच ब्रेन आणि तिसऱ्या घराची थीम दम म्हणजेच ताकद आहे. हृदय थीम असलेल्या घरामध्ये हृदयाशी खेळणारे स्पर्धक असतील. स्मार्ट स्पर्धक ब्रेन थीम असलेल्या घरात असतील. दम थीमवर आत्मविश्वासपूर्ण स्पर्धक असतील.

यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांना फोन देण्यात आले आहेत. हा फोन हार्ट थीम असलेल्या घरात ठेवला जाईल. जिथून स्पर्धक त्यांच्या मनातील भावना शेअर करतील. यासोबतच स्पर्धकांना हार्ट थीम असलेल्या घरात वैयक्तिक बाथरूम आणि थेरपी यांसारख्या सुविधाही मिळतील. अर्किन नावाची खोली आहे ज्यामध्ये स्पर्धकांना सर्व काही मिळेल. 'बिग बॉस 17' मध्ये सलमान खानने यावेळी घरातून शो होस्ट केला. याआधीच्या सीझनमध्ये त्याने स्टेजवरून शो होस्ट केल्याचे आपण पाहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT