Isha Malviya Father On Abhishek Kumar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Isha Malviya च्या वडिलांनी तिचा एक्स बॉयफ्रेंड Abhishek Kumar ला केला सपोर्ट, म्हणाले - 'तू जे केलंय...'

Isha Malviya Father On Abhishek Kumar: या फॅमिली वीकेंडमध्ये ईशा मालवीयाचे (Isha Malviya) वडील आशिष मालवीय आणि अभिषेक कुमारच्या (Abhishek Kumar) आई संध्या बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री करतात.

Priya More

Isha Malviya And Abhishek Kuamr:

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मध्ये फॅमिली वीकेंड झाला. यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये राहिलेल्या सर्व सदस्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घरामध्ये येऊन त्यांना सपोर्ट केला. आपल्या कुटुंबीयांना ऐवढ्या दिवसांनंतर भेटून घरातील सदस्यांसोबत बिग बॉसचे प्रेक्षक देखील भावुक झाले. या फॅमिली वीकेंडमध्ये ईशा मालवीयाचे (Isha Malviya) वडील आशिष मालवीय आणि अभिषेक कुमारच्या (Abhishek Kumar) आई संध्या बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री करतात.

वडिलांना पाहून ईशा खूपच भावुक झाली होती. दोघेही एकमेकांना मिठी मारून रडले. ईशा आणि तिच्या वडीलांमध्ये खूप गप्पा झाल्या. यावेळी ईशाचे वडील आपल्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमारच्या समर्थनार्थ बोलले. त्यांनी आपल्या मुलीला मर्यादा ओलांडू नको, असा सल्लाही दिला. त्यानंतर वडिलांच्या सल्ल्यानुसार ईशाने अभिषेकच्या आईची त्याच्यावर वैयक्तिक टिप्पणी केल्याबद्दल माफीही मागितली.

ईशाच्या वडिलांनी बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर ईशाला बऱ्यापैकी समजावले. ईशाचे वडील म्हणाले, 'पोकिंगला एक मर्यादा असते, जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे'. एवढेच नाही तर त्यांनी समर्थ जुरेलला एकट्याने खेळण्याचा सल्ला देखील दिला. ईशाच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते ईशाला म्हणत असल्याचे दिसत आहे, 'तू जे केलंय ते तू करायला नको होते. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. विशेषतः पोकिंगला. तुम्ही त्याला खूप जास्त पोक केले. जे खूप चुकीचे होते. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.'

बिग बॉसच्या प्रोमोमध्ये ईशा तिच्या वडिलांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकताना दिसत आहे आणि ती पुन्हा असे काही करणार नाही असे आश्वासन देखील त्यांना देते. त्यानंतर, अभिषेक कुमारची आई बिग बॉसच्या घरात एन्ट्री करते. आईला आल्याचे पाहून अभिषेक रडू लागतो. यावेळी अभिषेक आणि त्याच्या आईमध्ये देखील खूप चर्चा होते आणि यादरम्यान ईशा अभिषेकच्या आईसोबत थेरपी रूममध्ये जाते. तिथे ईशा अभिषेकच्या आईची माफी मागताना दिसते. दरम्यान, बिग बॉस 17 ला लवकरच विनर मिळणार आहे. बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी घरातील सर्वच सदस्य खूप मेहनत घेताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

Beed: पोलिस दलात खळबळ! बीडमध्ये ACBची मोठी कारवाई, २ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT