Isha Malviya And Samarth Jurel Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Isha Malviya Samarth Jurel Viral Video: Bigg Boss मध्ये नेमकं चाललंय काय, 'तसला' प्रकार कॅमेऱ्यात कैद; नेटकरी संतापले

Bigg Boss 17 Latest Episode Update: ईशा मालवीय आणि बॉयफ्रेंड समर्थचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Isha Malviya And Samarth Jurel Viral Video

लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून चर्चेत राहिलेल्या ‘बिग बॉस १७’ची प्रचंड चर्चा होत आहे. कायमच टीआरपी चार्टमध्ये अव्वल असलेल्या या शोमध्ये आपल्याला मैत्री, प्रेम आणि वादविवाद पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी इशा मालविय आणि अभिषेक कुमार यांच्या लव्हस्टोरीची चर्चा होत होती. पण असे असतानाच ‘बिग बॉस’च्या घरामध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या रुपात इशाचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलने घरात एंट्री केली. त्याने एन्ट्री केली आणि ट्रोलिंगचा भडीमार होऊ लागला. (Bigg Boss)

सध्या सोशल मीडियावर ईशा आणि समर्थची एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा वीकेंड का वार एपिसोडमधील व्हायरल व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये, समर्थ आणि ईशा बेडवर बसले दिसत आहे. बोलत असताना ईशा थोडीशी नाराज दिसत आहे. अचानक बोलत असताना समर्थ तिला किस करताना दिसत आहे. दोघांचाही किसिंग करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याला प्रचंड ट्रोल करीत आहे. (Bollywood)

व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले असून समर्थने केलेल्या या कृत्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध केला आहे. ‘त्यांना टेम्पटेशन आयलंडवर पाठवा’, असं एका यूजरने व्हिडीओवर कमेंट केली आहे. तर बऱ्याच जणांनी या शोची तुलना ‘लस्ट स्टोरीज’ सोबत केली आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, ‘आपण हा शो स्वत: सोडू शकतो का?, ईशा तू या सीझनमध्ये चांगल्या स्पर्धकांपैकी एका स्पर्धकांमध्ये येते, पण समर्थने हा शो सोडण्याची गरज आहे. तर आणखी एकाने समर्थचे कृत्य पाहून ‘तू चुकीच्या शोमध्ये आला’असल्याचे म्हणत ट्रोल केलं. (Trolled)

ईशा मालवीय सुरुवातीपासून ‘बिग बॉस १७’च्या घरात स्पर्धक आहे, तर समर्थ जुरेलने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला. शोमध्ये प्रवेश केल्यानंतर समर्थने तो ईशाचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले. सुरुवातीला ईशाने याला नकार दिला असला तरी नंतर तिने दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे मान्य केले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ मध्ये सलमान खानने ईशाला समर्थ आणि अभिषेकसोबत नेमके नाते काय आहे? याबद्दलची माहिती द्यायला सांगितली होती. (Entertainment News)

अंकिता लोखंडे, विकी जैन, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्या, अनुराग ढोबळ, जिग्ना व्होरा, मुनव्वर फारुकी, फिरोज खान उर्फ ​​खानजादी, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, रिंकू धवन, अरुण श्रीकांत आणि सना रईस खान सध्या हे स्पर्धक घरामध्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT