Bigg Boss 17 Salman Khan First Look Twitter @BiggBoss_Tak
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Update: 'बिग बॉस 17'च्या सेटचा फर्स्ट लूक व्हायरल, यंदाची थीम काय असेल, लगेच येईल अंदाज

Salman Khan Photo: 'बिग बॉस'चा होस्ट सलमान खानचा शोच्या ग्रँड प्रीमियरमधील फर्स्ट लूक समोर आला आहे.

Pooja Dange

Salman Khan's First Look From Bigg Boss Grand Premier:

टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो 'बिग बॉस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस'चे १७ वे पर्व पुन्हा मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'बिग बॉस'चे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत अनेक नावांची चर्चा होत आहे. या चर्चांदरम्यान 'बिग बॉस'चा होस्ट सलमान खानचा शोच्या ग्रँड प्रीमियरमधील फर्स्ट लूक समोर आला आहे.

'बिग बॉस १७'चा ग्रँड प्रीमियर १५ ऑक्टोबरला होणार आहे. याआधीच शोच्या ग्रँड प्रीमियरची झलक देखील समोर आली आहे. या फोटोंमध्ये सलमान खान फुल स्वॅगमध्ये दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सलमान खान रेड अँड ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. रेड लेदर जॅकेट, ब्लॅक टी-शर्ट आणि फंकी डेनिममध्ये सलमानचा डॅशिंग लूक त्याचा चाहत्यांना खूप आवडेल.

'बिग बॉस १७'चा सेट देखील खूप भन्नाट असल्याचे दिसत आहे. तर यावेळी 'बिग बॉस' सेट देखील खूप प्रशस्त आहे. सलमान खानच्या या फोटोसह सेटची झलक देखील व्हायरल झाली आहे. खूप मोठे ट्रेनचा डब्बा, भाला मोठा ड्रॅगन असं सर्वच या या सेटच्या पहिल्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

यावेळी 'बिग बॉस'मध्ये १६ स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. अंकिता लोखंडे, विक्की जैन, मुनव्वर फारुकी, ईशा मालवीय आणि विवेक चौधरीसह अनेक सेलेब्रिटी आणि नॉन सेलेब्रिटी 'बिग बॉस १७' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.

१५ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता 'बिग बॉस १७' सुरु होणार आहे. प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉम जिओ सिनेमावर २४ तास हा शो लाईव्ह पाहू शकतात. त्याशिवाय सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवार रात्री ९ वाजता कलर्सवर पाहू शकता. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT