Bigg Boss 17 First Eviction Contestant Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 First Eviction: 'विकेंड का वार' मध्ये सलमान कोणावर बरसला?, मन्नारा, नाविद का अभिषेक? कोण गेलं घराबाहेर...

Bigg Boss 17 Latest Update: पहिल्याच आठवड्यामध्ये झालेल्या नॉमिनेशन राऊंडमध्ये कोणता स्पर्धक घराबाहेर गेला याची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 First Eviction Contestant

आठवड्याभरापासून सोशल मीडियावर ‘बिग बॉस १७’ची जोरदार चर्चा होत आहे. पहिल्या दिवसापासून जोरदार भांडण, क्षुल्लक कारणामुळे एकमेकांमधील वाद प्रेक्षकांना पाहायला मिळला. नुकतंच शनिवारी आणि रविवारी ‘विकेंड का वार’ रंगला. यावेळी सलमानने आपल्या खास अंदाजामध्ये स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली असून त्यांची चांगलीच शाळा घेतली. पहिल्याच आठवड्यामध्ये झालेल्या नॉमिनेशन राऊंडमध्ये कोणता स्पर्धक घराबाहेर गेला याची जोरदार चर्चा होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘बिग बॉस १७’ काही बॉलिवूड सिनेमांमधील कलाकारांनीही प्रमोशनसाठी सलमानच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित राहिलेल्या सर्वच सेलिब्रिटींनी स्पर्धकांसोबत दिलखुलास संवाद साधला. सध्या सोशल मीडियावर कंगाना आणि सलमान खानच्या डान्सचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यात खानजादीचा आणि मुनव्वरचा वाद संपूर्ण घराने पाहिला. त्यामुळे ‘विकेंड का वार’मध्ये सलमानने खानजादीला चांगलेच खडेबोल सुनावले. नुकताच झालेल्या ‘विकेंड का वार’मध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पहिल्या नॉमिनेशन राऊंडची.

मन्नारा चोप्रा, नावेद सोले आणि अभिषेक कुमार या तीन स्पर्धकांचे नॉमिनेशन झाले होते. सलमानने काल घरातून बाहेर जाण्याऱ्या स्पर्धकांमध्ये मन्नाराचे नाव घेतले. तिचे नाव घेताना सलमान म्हणाला की, ‘मन्नाराला कमी मतं मिळाल्यामुळे तिला घरातून बाहेर जावे लागत आहे. ’ त्यानंतर घरासह सर्वत्र गंभीर वातावरण झाल्यानंतर सलमानने हळूच हा विनोद असल्याचे सांगितले. तिला घर सोडून जावं लागणार नाही. असं म्हणत सलमानने सर्वत्र विनोदी वातावरण निर्माण केले.

त्यानंतर सलमानने पहिला आठवड्यात सर्व स्पर्धक सुरक्षित असल्याची घोषणा केली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असल्यामुळे घरातून कोणीही बाहेर जाणार नाही. त्यामुळे या आठवड्यात सर्वच स्पर्धक सुरक्षित आहेत. यंदाच्या आठवड्यामध्ये घरातले सर्व स्पर्धक कोणाला नॉमिनेट करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT