Abhishek Kumar And Sidharth Shukla Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: अभिषेक कुमारने नॉमिनेशन टास्कमध्ये दाखवला सिद्धार्थ शुक्लासारखा Attitude, एकटाच अंकिता-विकी-ईशाला नडला

Priya More

Bigg Boss 17 Episode:

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17'ला (Bigg Boss 17) लवकरच विनर मिळणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये राहिलेले सर्व सदस्य या शोची ट्रॉफी आपल्या नावावर व्हावी यासाठी खूप मेहनत घेत आहेत. विनरच्या या यादीत अंकिता लोखंडेपासून (Ankita Lokhande) मुनावर फारुकीपर्यंतच्या (Munawar Faruqui) नावांचा समावेश आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सध्या भांडणाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिषेक कुमारने (Abhishek Kumar) समर्थ जुरेला चापट मारली होती. त्यानंतर त्याची बिग बॉसच्या घरातून हाकलपट्टी करण्यात आली. पण सलमान खानचे आभार मानत अभिषेक कुमारने घरात पुन्हा धमाकेदार एन्ट्री केली. आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अभिषेक कुमारने सिद्धार्थ शुक्लासारखा एटीट्यूड (Attitude) दाखवला आहे.

'बिग बॉस 17'च्या नुकताच आलेल्या एपिसोडमध्ये एक नॉमिनेशन टास्क झाला. ज्यामध्ये घरातील अनेक सदस्य नॉमिनेट झाले. या टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये वाद झाला. यावेळी अभिषेक कुमारचा पारा चांगलाच वाढला. टास्कदरम्यान तो अंकिता लोखंडे, विकी जैन आणि ईशा मालवीय याना एकटाच नडला. त्याची स्टाईल पाहून घरातील सर्व सदस्य थक्क झाले. या एपिसोडमध्ये अभिषेक कुमारमध्ये सिद्धार्थ शुक्लाची झलक पाहायला मिळाली. सिद्धार्थ शुक्ला देखील बिग बॉसच्या घरामध्ये असताना अशाच पद्धतीने वागला होता.

बिग बॉसच्या ताज्या एपिसोडमध्ये झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये अनेक सदस्यांवर टांगती तलवार आहे. या लिस्टमध्ये अरुण मशेट्टी, समर्थ जुरेल, आयशा खान, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, विकी जैन आणि मुनव्वर फारुकी यांच्या नावांचा समावेश आहे. तर अंकिता लोखंडे आणि ईशा मालवीय या आठवड्यात सुरक्षित आहेत. दरम्यान, बिग बॉस 17 चा फिनाले 28 जानेवारीला होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शोच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. बिग बॉस 17 च्या विजेत्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सीझनचा विनर कोण होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT