Bigg Boss 17 Week 11 Update Twitter
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: यंदाच्या विकेंडला कोणाचा होणार पत्ता कट?; सोशल मीडियावर होतेय 'या' स्पर्धकाची चर्चा...

Bigg Boss 17 Weekend Ka War Update: येत्या 'विकेंड का वार' ला 'बिग बॉस १७'च्या घरातून कोणता स्पर्धक घरातून बाहेर जाणार याची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Week 11 Update

लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त म्हणून 'बिग बॉस १७' कडे कायम पाहिले जाते. या शोसाठी वाद काही नवीन नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुनव्वर फारूकी आणि मन्नारा चोप्रा यांच्यामध्ये तुफान राडा झाला होता, त्यांच्या वादानंतर 'बिग बॉस १७'च्या घरामध्ये आयेशाने वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतली. या सर्व घडामोडीनंतर सर्वच स्पर्धकांच्या खेळामध्ये एक नवा ट्वीस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या 'विकेंड का वार' सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर कोणता स्पर्धक 'बिग बॉस १७'च्या घरातून बाहेर जाणार याची चर्चा होत आहे. (Bigg Boss)

नुकतंच एक्स (ट्वीटर)वर बिग बॉसचं फॅनपेज असणाऱ्या 'द खबरी'ने दिलेल्या माहितीनुसार, या 'विकेंड का वार'मध्ये कोणताही स्पर्धक घराबाहेर जाणार नाही. त्यांनी या बद्दलची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर दिलेली आहे. " 'विकेंड का वार' अपडेट... फायनली प्रेक्षकांवरील अत्याचार संपले आहेत. एमजी संपला, प्रवास संपला." अशी माहिती त्यांनी स्वत: दिलेली आहे. नेमकं यंदाच्या विकेंडला कोणाला बाहेर काढलेय, याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. (Tv Serial)

यंदाच्या आठवड्यामध्ये, नील भट्ट, रिंकू धवन, आयशा खान आणि अभिषेक कुमार यांच्यापैकी एक सदस्य बाहेर जाण्याची शक्यता आहे. नुकतंच आणखी एका फॅनपेजने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आठवड्यामध्ये रिंकू धवन बाहेर जाण्याची शक्यता आहे. नेमकं येत्या आठवड्यामध्ये 'बिग बॉस १७' च्या घरातून कोण बाहेर जाणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वाईल्ड कार्ड म्हणून घरात आलेली आयेशा मध्येच आपला खेळ सोडून बिग बॉसचं घर सोडून जाण्याची शक्यता आहे. (Bollywood)

आयेशाचं आणि मुनव्वरचं गेल्या आठवड्यात जोरदार भांडण झालेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. यावेळी भांडणामध्ये आयेशाने मुनव्वरवर गंभीर आरोपही केलेले आपण पाहिले. यंदाच्या 'विकेंड का वार' मध्ये जोरदार वाद पाहायला मिळणार आहेत. यावेळी सलमान प्रत्येक स्पर्धकाची चांगलीच शाळा घेणार असून अनेकांची त्यांच्या परफॉर्मन्सवरुनही कान उघडणी केलेली आहे. येत्या महिन्यामध्ये 'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले होणार असल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

SCROLL FOR NEXT