Ankita Lokhande  Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'खरंच तेव्हा माझ्याकडे पैसे नसायचे...', 'पवित्र रिश्ता'साठी अंकिता लोखंडेला मिळायचं फक्त इतकं मानधन

Priya More

Ankita Lokhande:

'बिग बॉस १७'ची (Bigg Boss 17) स्पर्धक अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील ती सध्या आघाडीची स्पर्धक आहे. सध्या सोशल मीडियावर अंकिताचीच चर्चा होत आहे. अंकिताची गेम खेळण्याची स्टॅटेजी, तिचं घरातील वावरणं प्रत्येकाला आवडत आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये इतर स्पर्धकांशी संवाद साधताना अंकिता तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करत आहे. नुकताच अंकिताने सुशांत सिंह राजपुतसोबतच्या (Sushant Singh Rajput) ब्रेकअपबद्दल सांगितले. त्यानंतर आता तिने तिच्या करिअरची सुरूवात आणि पहिल्या कमाईविषयीची माहिती एका स्पर्धकासोबत गप्पा मारताना शेअर केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंकिता लोखंडेच्या इन्स्टाग्राम पेजवरून नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे मुनव्वर फारूकीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी अंकिता मुनव्वरला तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल सांगताना दिसत आहे. अंकिता लोखंडेने अतिशय तरुण वयात मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. तिने लोकप्रिय टीव्ही मालिका 'पवित्र रिश्ता' या मालिकेमध्ये अर्चनाची भूमिका साकारली होती. या मालिकेतूनच ती घराघरामध्ये पोहचली आणि तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली होती. या मालिकेतील अंकिताच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

अंकिताच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'तिने हे सर्व केले आहे, परंतु ते कधीही सोपे नव्हतं ', असं लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंकिता लोखंडे मुनव्वरला सांगते की, 'मी १८ व्या वर्षी मुंबईत आली. मी खूप स्मार्ट होती. मी नेहमी जागरूक राहायचे की कोणी मला वेडं बनवू नये. मी असं करेल मी तसं करेल अशी भाषा मी कधीच करायची नाही. मला माहिती होते की मला काय करायचे आहे. माझ्यावर एक वेळ अशी होती की खरंच माझ्याकडे पैसे नसायचे. तेव्हा मला कळत नव्हतं की मी जेवणाचा प्रश्न सोडवायचा की ऑडिशनला जायचं. माझ्या आयुष्यात तो काळ देखील आला होता. कारण आई-वडिलांकडून सतत किती पैसे मागणार.'

अंकिता पुढे म्हणते की,'पवित्र रिश्ता या मालिकेसाठी मला प्रति दिन २००० रुपये मिळत होते. त्यातून माझा टीडीएस देखील कापला जात होता. म्हणजे ५० हजार माझ्या अकाऊंटमध्ये येणार यामुळे मी खूप आनंदी असायचे. मी ५० हजार रुपय कधीच माझ्या आयुष्यामध्ये पाहिले नव्हते. माझ्या आई-वडिलांना लोकं बरंच काही बोलली आहेत. पण माझ्या आई-वडिलांची साथ ही माझ्यासाठी मोठी ताकद होती.'

अंकिता लोखंडेचा अभिनयाचा हा प्रवास काही सोपा नव्हता. खूप मेहनत आणि कठोर परिश्रम घेऊन ती इतवर पोहचली आहे. अंकिताने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. ही मालिका २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत अंकितासोबत सुशांत सिंह राजपुत मुख्य भूमिकेमध्ये होता. सुशांत आणि अंकिताच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती मिळाली होती. या मालिकेच्या यशानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

SCROLL FOR NEXT