Salman Khan  Twitter @BiggBoss_Tak
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूड, बिग बॉसच्या घरामध्ये राहण्याची मिळणार संधी

Bigg Boss Fans: सलमान खानचे (Salman Khan) चाहते आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी ही बातमी खूपच उत्साहित करणारी आहे. कारण बिग बॉसच्या घरामध्ये सलमान आणि बिग बॉसच्या चाहत्यांना राहण्याची संधी मिळणार आहे.

Priya More

Salman Khan Viral Video:

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा दिवसेंदिवस खूपच रंगतदार होत चालला आहे. या शोच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. सलमान खानचे (Salman Khan) चाहते आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी ही बातमी खूपच उत्साहित करणारी आहे. कारण बिग बॉसच्या घरामध्ये सलमान आणि बिग बॉसच्या चाहत्यांना राहण्याची संधी मिळणार आहे. सलमान खाननेच ही गुड न्यूज शेअर केली आहे. त्यामुळे त्याचे बिग बॉसचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणतो, 'बिग बॉस, मी ऐकले आहे की तुमचे चाहते तुम्हाला बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी देण्याची विनंती करत आहेत. मग त्यांना या आलिशान घरात राहण्याचा अनुभव का देऊ नये?. त्यामुळे फिनालेनंतर या सीझनमधील घरातील सदस्य घराबाहेर कधी जातील. त्यामुळे कृपया या चाहत्यांना इथे येऊन राहण्याची संधी द्या. मला आशा आहे की तुम्ही, बिग बॉस, माझे ऐकाल आणि हे टाळणार नाही.'

बिग बॉसमधील सलमान खानच्या या विनंतीनंतर चाहते खूप उत्साहित झाले आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने 'मलाही जावे लागेल' असे लिहिले आहे. दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे की, 'हा चांगला प्लान आहे.' आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, 'सलमान सर प्लीज मला शोमध्ये बोलवा.' तर आणखी एका चाहत्याने लिहिले की, 'मी बिग बॉसचा मोठा चाहता आहे कृपया मला संधी द्या.'

दरम्यान, बिग बॉस 17 हा रिअॅलिटी शो सध्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि प्रेक्षकांकडून या शोला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य देखील प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. सध्या बिग बॉस 17 मध्ये विकी जैन, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, मुनावर फारुकी, मनारा चोप्रा, अरुण मशेट्टी हे स्पर्धक म्हणून दिसत आहेत. आता बिग बॉस 17 ची ट्रॉफी कोण जिंकणार हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाला ही ट्रॉफी मिळावी यासाठी प्रेक्षक त्यांना सपोर्ट करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT