bigg boss season 16 Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: 'बिग बॉस १६'विजेता स्पर्धकाला मिळणार लाखोंचं बक्षिस, रक्कम वाचाल तर चकीत व्हाल...

नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल असणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस १६'. येत्या काही दिवसांतच बिग बॉस हिंदी प्रेक्षकांची रजा घेणार आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 16: नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल असणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस १६'. येत्या काही दिवसांतच बिग बॉस हिंदी प्रेक्षकांची रजा घेणार आहे. बिग बॉसच्या घरातील कोणता स्पर्धक ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोबतच विजेत्याला किती मानधन मिळणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

नुकतेच बिग बॉसच्या १६ व्या पर्वातील टॉप पाच स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. त्यातून नुकतेच मिड वीक एव्हिक्शनमध्ये निम्रत कौरला घरातील सर्वच स्पर्धकांची रजा घ्यावी लागली आहे. सध्या 'बिग बॉस १६'च्या घरात शिव ठाकरे, अर्चना गौतम, एम.सी.स्टॅन, शालीन आणि प्रियांका चौधरी या पाच स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनालेची चुरस रंगणार आहे. आता या पाच जणांमधून विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

नुकतीच ‘बिग बॉस १६’च्या ट्रॉफीची पहिली झलक सर्वांना दाखवण्यात आली. यंदाची ट्रॉफी आतापर्यंत देण्यात आलेल्या ट्रॉफींपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि खास आहे. यावेळी ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीमध्ये एक युनिकॉर्न बनवण्यात आला आहे, जो चांदी आणि सोनेरी रंगाचा आहे.

‘बिग बॉस १६’च्या विजेता स्पर्धकासाठी यंदा बक्षिसाची रक्कम ५० लाख रुपये ठरवण्यात आली आहे. मात्र घरातील सदस्यांनी टास्कदरम्यान त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम गमावली. बिग बॉसने घरातील सदस्यांना गमावलेली बक्षीस रक्कम परत मिळवण्याची अनेक वेळा संधी दिली आहे, पण कोणालाही यश आलं नाही. त्यानुसार आता अखेर बिग बॉस १६ च्या विजेत्या स्पर्धकाला २१ लाख ८० हजार ही रक्कम मिळणार आहे.

फिनालेमध्ये मनी बॅग टास्क असेल. सूटकेसमध्ये १० किंवा २० लाख रुपयांची रक्कम असेल. त्या सुटकेससह अंतिम फेरीच्या शर्यतीतून कोण बाहेर पडणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाचा फिनालेविक सुरू झाला आहे. तर १२ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले रंगेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT