Sajid Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sajid Khan: साजिदला आत्मविश्वास पडला महागात, 'या' स्पर्धकांना दिली धमकी...

दिग्दर्शक साजिद खानने 'बिग बॉस १६'मध्ये एन्ट्री घेताच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्याला विरोध दर्शवला होता.

Chetan Bodke

Sajid Khan: बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपट दिग्दर्शक साजिद खान सध्या 'बिग बॉस १६' स्पर्धक आहे. साजिदने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्याला विरोध दर्शवला होता. सध्या साजिद खान टॉप खेळाडूंच्या यादीत असून त्याच्या सोबत शिव ठाकरे, निम्रत, एमसी स्टॅन, अब्दू रोझिक आणि सुंबूल तौकिर खान यांच्यासोबत गेम खेळत आहे.

या आठवड्यात नॉमिनेशन टास्क दरम्यान निम्रत आणि साजिदमध्ये पुन्हा एकदा वादाचे खटके उडाले आहेत. या सीझनमध्ये साजिदची ओळख म्हणजे नेहमीच वादात सापडणारा स्पर्धक अशी झाली आहे. या सीझनमध्ये अनेक स्पर्धकांचा आपापसातील वाद बराच विकोपाला गेला, खरंतर या सीझनची सुरुवातच वादाने झाली होती.

बिग बॉसच्या व्यतिरिक्त साजिदचे अनेक वाद सर्वश्रृत आहेत.अब्दू रोझिकचे ब्रेनवॉश करण्याचा आरोप सध्या त्याच्यावर करण्यात आला आहे. नुकत्याच टेलिकास्ट झालेल्या एका एपिसोडमध्ये, प्रियंका चौधरी, अब्दू सोबत कोणत्यातरी विषयावर बोलत असते. यावर साजिदने अब्दूला टेलिव्हिजन अभिनेत्रींपासूनच दूर राहण्याचा उत्तम सल्ला दिला आहे. बिग बॉस १६च्या सर्व स्पर्धकांचा अनोखा स्वॅग आहे.

नुकतंच शेअर केलेल्या प्रोमोत नॉमिनेशन टास्कमध्ये निम्रतने साजिदचं नाव घेताच तो चिडला."मला नॉमिनेशनचा फरक पडत नाही, मी नॉमिनेशनला घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. मी स्वतःला या शोच्या फिनालेमध्ये पाहतोय आणि माझ्याबरोबर मला या घरातील काही सदस्य दिसतात. तुम्ही मला १२ फेब्रुवारीपर्यंत नॉमिनेट करा आणि विजेतेपदाची ट्रॉफी कोण घरी नेतंय ते बघा” असं साजिद खानने तिला ओपन चॅलेंज दिले आहे. पण, साजिदचा हा ओव्हर कॉन्फिडंस नेटकऱ्यांना फारसा पचलेला नसून साजिदची ट्रोलिंग सुरु केली.

साजिद खानवर अनेक नेटकऱ्यांनी टीका- टीप्पणी केली असून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात साजिदसोबत सुंबुल तौकीर, अर्चना गौतम, शालिन भानोत, टीना दत्ता आणि श्रीजीता रे हे सदस्य नॉमिनेटेड झाले आहेत. यांच्यापैकी कोण घराबाहेर पडणार हे आठवड्याच्या शेवटी कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT