Salman Khan Eliminated Priyanka Chaudhary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: सलमान खानने केले प्रियंकाला घराबाहेर, म्हणाला 'तुम्ही ओझे झाला आहात'

प्रियांका अंकितवर वर्चस्व गाजवत असल्याचे दिसून आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss 16 Episode Update: हिंदी 'बिग बॉस 16'च्या घरात राडा झाला नाही, असे फार क्वचित पाहायला मिळते. इथे रोज नवीन मुद्दे, रोज नवीन किस्से, नवीन मैत्री, नवीन वैर आणि नवनवीन गोष्टी घडत असतात. 'बिग बॉस'च्या घरात गेल्या काही दिवसांत बरेच काही घडले आहे. शिवसोबत झालेल्या भांडणामुळे अर्चना गौतमला घर सोडावे लागले. छोट्या-छोट्या गोष्टींवरून इथे मित्रांमध्ये भांडणे होत असतात. काल रात्री म्हणजेच शुक्रवारी सलमान खानने कुटुंबातील सदस्यांची शाळा घेण्यासाठी आला होता.

काल सलमान खानने प्रियांका आणि अंकितसोबत जास्त वेळ घालवला. सलमानने दोघांनाही अॅक्टिव्हिटी रूममध्ये बोलावले. जिथे दोघांनाही खाजगीत अनेक गोष्टी समजावून सांगण्यात आल्या. सर्वात आधी सलमानने या दोघांना काही व्हिडिओ दाखवले. ज्यामध्ये प्रियांका अंकितवर वर्चस्व गाजवत असल्याचे दिसून आले. मात्र, प्रियांका समोर कोणीही असो कोणाचेही ती ऐकत नसल्याचे घरात दिसून आले आहे. मग समोर अंकित असला तरी ती त्याला जुमानत नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान अंकितला सांगतो की तो हुशार आहेस आणि तू योग्य पद्धतीने विचार करतोस. (Salman Khan)

सलमानने पुढे सांगितले, 'अंकित आपले विचार मांडू शकत नाही. त्यामुळे बाहेर असे वातावरण तयार झाले आहे की प्रियंका त्यांच्यावर वर्चस्व गाजवत आहे. या सर्व गोष्टींशिवाय सलमान प्रियांकाला अनेक गोष्टी सांगतो. त्यामुळे प्रियांकाला खूप त्रास होतो. तुम्ही दोघेही एकमेकांवर ओझे झाला आहात.' ज्यावर प्रियंका म्हणते की तिचा अति काळजी घेण्याच्या स्वभावामुळे ती वर्चस्व दाखवत आहे असे दिसत आहे. यावेळी अंकित गप्प होता तो यावर काहीच बोलला नाही. (Bigg Boss)

त्यानंतर अ‍ॅक्टिव्हिटी रूममधून बाहेर आल्यानंतर सलमान घरातून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांची नाव घेतले. त्याने प्रियांकाचे नाव घेतल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. प्रियांका एलिमिनेट झाल्याचा दोष अंकित स्वतःला देतो आणि म्हणतो त्याच्या चुकीची शिक्षा तिला मिळाली आहे. प्रियांका रडताना दिसत आहे. तसेच ती इतर स्पर्धकांना चांगले खेळण्याचा सल्ला देताना दिसते. मात्र प्रियांका खरंच घराबाहेर गेली आहे का? की सलमान फिरकी घेत आहे हे आपल्याला पुढच्या भगत कळेलच. प्रियांका 'बिग बॉस 16'च्या घरातील एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे आणि तिचे असे जाणे कोणालाच पचनी पडणार नाही. (TV)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT