Shiv Thakare Meet Madhuri Dixit Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare Meet Madhuri Dixit: शिवचा नुसताच राडा... जिचे चित्रपट पाहण्यासाठी तासभर रांगेत उभा राहिला आता तिच्याच हस्ते...

‘खतरों के खिलाडी १३’मुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली असून त्यामुळे त्याच्या आनंदाला उधाण आलंय.

Chetan Bodke

Shiv Thakare Meet Madhuri Dixit: ‘बिग बॉस १६’ फेम शिव ठाकरे सध्या सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय आहे. शिव ठाकरे लवकरच ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये सहभागी होणार आहे. ‘बिग बॉस १६’मध्ये टॉप ५ मध्ये असताना शिव ठाकरेने खतरों के खिलाडीसाठी दिलेल्या ऑडिशन मध्ये त्याची निवड सुद्धा झाली होती. त्याने एका शो साठी जवळपास अनेक लाखोंचे मानधन आकारले आहे. ‘खतरों के खिलाडी १३’मुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली असून त्यामुळे त्याच्या आनंदाला उधाण आलंय.

शिवला नुकतंच ग्लोबल एक्सेलेन्स अवॉर्ड २०२३मध्ये बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या हस्ते ‘People’s Choice Reality TV Star’ हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर शिव ठाकरे पुरता भारावून गेलाय. शिवने फोटो पोस्ट करत सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. शिव पोस्टमध्ये म्हणतो, “माधुरी दीक्षितच्या चित्रपटासाठी तिकीटाच्या रांगेत उभे राहण्यापासून....तिच्याकडून ‘पीपल्स चॉईस रिॲलिटी टीव्ही स्टार’ पुरस्कार मिळवण्यापर्यंत!! स्वप्न खरी होतात...” अशी भावना यावेळी शिव ठाकरेने व्यक्त केली.

नुकताच शिवचा पुढचा सिनेकारकिर्दितला प्रवास सुरू झाला आहे. लवकरच शिवचा ‘खतरों के खिलाडी १३’मधला प्रवास सुरू होणार आहे. यावेळी त्याने शोमध्ये सहभागी होण्यापुर्वी त्याच्या आईचा आणि त्याचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यात शिवची आई त्याचे औक्षण करताना दिसत आहे. शिव आता लवकरच आईचा आशीर्वाद घेत ‘खतरों के खिलाडी’चा १३ वा सिझन गाजवण्यासाठी निघाला आहे. त्या व्हिडीओवर चाहत्यांनी नक्कीच शिवच जिंकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: ...युबीटी को पता चला कौन है असली शेर, खरी शिवसेना कुणाची हे जनेतेने दाखवून दिलं; विजयानंतर शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Navi Mumbai: नवी मुंबईवरून नागपुरला अवघ्या दीड तासांत; विमानसेवा कधीपासून सुरू होणार; तिकीटाचे दर किती?

Maharashtra Live News Update: नगरपरिषद निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता महायुतीचं मिशन महापालिका

Ghevda Bhaji Recipe : घेवड्याची चमचमीत भाजी कशी कराल? वाचा पारंपरिक रेसिपी

Sachin Pilgaonkar : 'ही डान्स स्टेप अक्षय खन्नाला सचिनजीनी शिकवली'; 'धुरंधर'च्या गाण्यावर सचिन-सुप्रिया थिरकले, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT