Rubina Dilaik Twins Babies Instagram
मनोरंजन बातम्या

Rubina Dilaik Pregnancy: रुबिना दिलैक होणार जुळ्या बाळांची आई; पती अभिनवला गुडन्यूज मिळताच म्हणाला...

Rubina Dilaik Twin Pregnancy: ‘बिग बॉस 14’फेम रुबिना दिलैक लवकरच आई होणार आहे. मात्र ती एका नाही तर दोन मुलांना जन्म देणार असल्याची माहिती तिने एका मुलाखतीतून दिली आहे.

Chetan Bodke

Rubina Dilaik Twins Babies

‘बिग बॉस 14’फेम रुबिना दिलैक काही दिवसांपासून तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैकने सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. त्यानंतर रुबिनाने चाहत्यांसोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये, जुळ्या मुलांची किंवा मुलींची आई होणार असल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. सोबतच पुढे तिने त्या मुलाखतीमध्ये अपघाताचा किस्सा सुद्धा सांगितला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘द ममाकॅडो शो’ या पॉडकास्ट शो ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुबिनाने सांगितले की, “आम्हाला दोघांनाही जेव्हा आम्ही आई- बाबा होणार आहेत, हे कळलं त्यावेळी काही वेळासाठी धक्काच बसला होता. आम्ही दोघेही कारमध्ये एकमेकांसोबत बोललो नाही. खरंच आम्ही आई- बाबा होणार या बातमीवर आमचा विश्वास बसत नव्हता. जवळपास तीन महिने कोणाला काही सांगू नका असे आम्हाला डॉक्टरांनी आधीच सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही कोणाला काहीही सांगितले नाही.”

“तीन महिन्यांनंतर केलेल्या सोनोग्राफीमध्ये, जुळ्या मुलांना पाहून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी दोन बाळांना जन्म देणार म्हणून खूपच आनंदित होते. सोनोग्राफी करुन आम्ही घरी परतत असताना, आमच्या कारला मागून एका ट्रकने धडक दिली होती. त्या धडकेमध्ये मला डोक्याला आणि पाठीला धक्का बसला होता. त्या धडकेनंतर मी इमरजेन्सी सोनोग्राफी करुन घेतली होती, त्यामध्ये दोन्ही बाळ सुखरुप होते. ती घटना आज आठवली तरी मला खूप भिती वाटते.” असं अभिनेत्रीने पॉडकास्टमध्ये सांगितले.

जून २०१८ मध्ये रुबिना आणि अभिनव लग्नबंधनात अडकले होते. या क्यूट कपलच्या लग्नाला पाच वर्ष झाले असून लवकरच रुबिना एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. सध्या रुबिनाला ९ वा महिना सुरु आहे. रुबिना ‘बिग बॉस १४’ची विजेती असून ‘छोटी बहू’ मालिकेतून प्रसिद्धी झोतात आली होती. तर लवकरच ती पंजाबी चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘चाल भज चलिए’ असे या चित्रपटाचे नाव आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT